संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्मच्या ४० पेक्षा जास्त प्रमुख प्रतिनिधींसमवेत सरकार चर्चा करून डीपफेक व्हिडीओबाबत एक फ्रेमवर्क तयार करणार आहे. डीपफेकचा दुरुपयोग रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याचीही तयारी सुरू आहे.
डीपफेक व्हिडीओ प्रकरणात आयटी व इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने गुरुवारी सकाळी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. केंद्रीय आयटी व इलेक्ट्रॉनिक्स मंत्री आश्विनी वैष्णव व या मंत्रालयाचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर हेही या बैठकीत सहभागी होणार आहेत. बैठकीत डीपफेक व्हिडीओच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी सर्व इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्मच्या प्रमुखांशी सखोल विचारविनिमय करण्यात येणार आहे. त्यानंतर दोन-तीन दिवसांत केंद्र सरकार डीपफेकबाबत संपूर्ण फ्रेमवर्क तयार करणार आहे.
धोक्याबाबत सरकारला चिंता सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीपफेकबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर केंद्र सरकार या विषयावर गांभीर्याने काम करीत आहे. यामुळे समाजाला होणाऱ्या धोक्याबाबत सरकार चिंतित आहे. देशातील १०० कोटींपेक्षा जास्त इंटरनेटधारकांची सुरक्षा सरकारसाठी सर्वांत महत्त्वाची आहे.विशेष म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने कोणत्याही व्यक्तीसारखा हुबेहूब चेहरा, शरीर व आवाजासह व्हिडीओ तयार केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही असाच एक व्हिडीओ तयार करण्यात आला होता.
असा असेल डीपफेकवर नवीन कायदा...nडीपफेकवर सरकार कठोर तरतूद करणार असून, ५० लाख रुपये दंड करण्यापासून सहा वर्षांच्या कारावासाच्या पर्यायावर चर्चा सुरू आहे. nइंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्मचे प्रमुख सरकारच्या कठोर तरतुदीवर आक्षेप घेत आहेत; परंतु सरकारच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, सरकार कठोर तरतुदी करण्यापासून मागे हटणार नाही.
सारा तेंडुलकर डीप फेक फोटोमुळे त्रस्त
nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा आणि युवा क्रिकेटपटू शुभमन गिलचा एक फोटो नुकताच व्हायरल झाला होता. या फोटोत साराने शुभमनच्या गळ्यात हात टाकलेला दिसत होता. एक्सवरील एका युजरच्या अकाउंटवरून हा फोटो पोस्ट करण्यात आला होता. या डीपफेक फोटोबद्दल साराने नाराजी व्यक्त केली आहे.nएक पोस्ट शेअर करत तीने म्हटले की, सोशल मीडिया हे आपल्या सर्वांसाठी आनंद, दु:ख आणि दैनंदिन घडामोडी शेअर करण्यासाठी एक व्यासपीठ आहे. तथापि, तंत्रज्ञानाचा गैरवापर पाहणे हे अस्वस्थ करणारे आहे. कारण, ते इंटरनेटचे सत्य आणि विश्वासार्हता हिरावून घेत आहे. माझे हे डीप फेक फोटो वास्तवापासून दूर आहेत.