नवी दिल्ली : भारताला अण्वस्त्र पुरवठादार गटाचे (एनएसजी)े सदस्यपद देण्यास विरोध करणाऱ्या व जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या मुद्द्यावरून, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताची कोंडी करणाऱ्या चीनला जशास तसे उत्तर देण्याचे भारताने ठरविले आहे. त्यासाठी व्हिएतनामशी लष्करी संबंध विकसित करण्यावर भर दिला आहे. व्हिएतनामला जमिनीवरून हवेत मारा करणारी आकाश क्षेपणास्त्र देण्याचा विचार भारताने सुरू केल्याचे वृत्त आहे. क्षेपणास्त्र विक्रीसंबंधी व्हिएतनामबरोबर चर्चा सुरू आहे.
व्हिएतनामला क्षेपणास्त्र देणार?
By admin | Published: January 10, 2017 1:14 AM