जयपूर: सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी व्यवहार्य नसल्याचं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. कोणालाही डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्यात येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये, असं आवाहन त्यांनी केलं. डिटेन्शन सेंटरमध्ये जाण्याची वेळ आलीच, तर त्यावेळी सर्वात पुढे मीच असेन, अशी ग्वाही त्यांनी दिली. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आम्हाला मान्य नाही, असं म्हणत गेहलोत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस देशवासीयांसोबत असल्यानं चिंता करण्याचं कारण नाही, असंदेखील ते म्हणाले. राजस्थानची राजधानी जयपूरमधल्या शहीद स्मारक परिसरात सीएए, एनआरसी विरोधात आंदोलन सुरू आहे. काल रात्री गेहलोत आंदोलनस्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला.
...तर सर्वात आधी मीच डिटेन्शन सेंटरमध्ये जाईन- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 10:23 AM