मुंबई: यंदा सरासरी इतका पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. ५ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान ९६ ते १०४ टक्के पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे. शेतकऱ्यांसह सर्वांसाठीच ही आनंदाची बातमी आहे. यंदा निनोसह सर्वच घटक सामान्य राहणार असल्यानं सरासरी इतका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे जून ते सप्टेंबर दरम्यान देशात सरासरी (९६ ते १०४ टक्के) पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्यानं दिली. यंदाच्या पावसाबद्दल हवामान खात्यानं व्यक्त केलेला हा पहिला अंदाज आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी इतका पाऊस होईल. या कालावधीत अल निनोमुळे होणारा परिणाम सामान्य असेल. पावसाच्या चारही महिन्यांमध्ये हीच परिस्थिती कायम राहील. त्यामुळे पाऊस चांगला होईल, अशी माहिती हवामान खात्यानं दिली.
गुड न्यूज! यंदा चांगला पाऊस होणार; हवामान खात्याचा सुखद अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 1:28 PM