शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

तेलंगणात केसीआर यांना धक्का बसणार, एका मतदारसंघात पराभूत हाेणार? तर दुसऱ्या ठिकाणी...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2023 7:22 AM

Telangana Assembly Election: तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे गजवेल आणि कामारेड्डी या दाेन मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत.

तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे गजवेल आणि कामारेड्डी या दाेन मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. बहुतांश एक्झिट पाेलमध्ये राज्यात बीआरएसचा पराभव हाेणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. अशावेळी स्वत: केसीआर यांच्या मतदारसंघातील चित्र काय असेल, याबाबत चर्चा सुरू आहे. राज्यात ‘केस स्टडीज’ नावाच्या संस्थेने एक्झिट पाेलची आकडेवारी जाहीर केली आहे. 

- केसीआर यांना दाेन्ही ठिकाणी कडवी झुंझ मिळू शकते. कदाचित ते कामारेड्डी येथून पराभूत हाेतील, असा अंदाज आहे. येथे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी हे त्यांच्याविराेधात रिंगणात उतरले आहेत.- गजवेल येथे कमी फरकाने त्यांचा विजय हाेईल, असे ‘केस स्टडीज’ने म्हटले आहे. - सिरसिला येथे केसीआर यांचे पुत्र के. टी. राव हे विजयी हाेतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तेलंगाणात ११९ जागांसाठी ३० नाेव्हेंबरला मतदान झाले. एकूण ७०.६० टक्के मतदान झाले आहे. मात्र, यावेळी मतदानात सुमारे ३ टक्के घट झाली आहे. गेल्यावेळी ७३.७४ टक्के मतदान झाले हाेते. राज्याची राजधानी हैदराबादने पुन्हा एकदा निराशा केली. हैदराबादसह काही प्रमुख शहरांमध्ये मतदान कमी झाले आहे. मतदारांनी पाठ फिरवल्यामुळे सर्वच पक्षांची धाकधूक वाढली आहे. 

राजधानीतच कमी मतदानराजधानीत अवघे ४६.५ टक्के मतदान झाले. राज्याच्या तुलनेत ते २४ टक्के कमी आहे. या शहरात तेलुगू सिनेसृष्टीतील दिग्गज आणि प्रचंड लाेकप्रिय कलाकार राहतात. त्यांनी स्वत: मतदान करुन लाेकांना मतदानाचे आवाहन केले हाेते. कमी मतदान झालेले पहिले पाच मतदारसंघ हैदराबाद शहरातील आहेत.

सर्वाधिक मतदानमुनूगाेडे         ९१.५%पालाईर        ९०.२%आलेर        ९०.१%भाेंगीर        ८९.९%

सर्वात कमी मतदानयाकुतपुरात      ३९.६%चारमीनार        ४१.४%ज्युबिली हिल्स   ४५.२%

- ग्रामीण भागातील मतदारसंघात लाेकांनी भरभरून मतदान केले.- शहरी भागात मात्र लाेकांनी घरातच बसून राहणे पसंत केले. 

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती