'देशवासीयांचे डोळे उघडणाऱ्या 'या' प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान मोदींनी द्यावेत?
By महेश गलांडे | Published: February 8, 2021 03:58 PM2021-02-08T15:58:05+5:302021-02-08T16:05:48+5:30
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी मोदींच्या भाषणानंतर ट्विटरवरुन प्रश्नांची मालिकाच लावली आहे. देशवासीयांचे डोळे उघडणाऱ्या या प्रश्नांची उत्तर द्या
नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने शेतकरीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करत विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना एमएसपीची हमी देत एमएसपी होती, आहे आणि कायम राहील, असे सांगितले होते. तसेच, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचेच असून शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या योजनांचा पाढाच मोदींनी राज्यसभेत वाचला. त्यानंतर, काँग्रेसनेही मोदींवर टीका केली असून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी मोदींच्या भाषणानंतर ट्विटरवरुन प्रश्नांची मालिकाच लावली आहे. देशवासीयांचे डोळे उघडणाऱ्या या प्रश्नांची उत्तर द्या, असे म्हणत पतंप्रधान नरेंद्र मोदींच्या कथनी आणि करणीमध्ये अंतर का आहे, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी विचारला आहे. सुरजेवाला यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये, शेतीवर टॅक्स, खतांवर टॅक्स, किमान आधारभूत किंमत यांसह अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
7/n
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) February 8, 2021
भारत की आँखे खोल देने वाले कुछ सवालों के जवाब दीजिये-:
6) क्या ये सही नही कि 73 साल में पहली बार खेती पर GST लगाया - खाद पर 5%, कीटनाशक दवाईयों से लेकर कृषि यंत्रों पर 12% से 18 प्रतिशत तक?
डीज़ल पर 820% एक्साइज क्यों बढ़ाई?#RajyaSabhahttps://t.co/jCqU8NsbLm
1. मोदी सरकारने सत्तेवर विराजमान होताच 12 जून 2014 रोजी राज्यांद्वारे आधारभूत किंमतीवर अधिकतम देण्यात येणाऱ्या 150 रुपयांचा बोनस आपण बंद केला, हे खरं नाही का?
2. डिसेंबर 2014 मध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा असलेल्या भूमी अधिग्रहनसाठी योग्य दाम देणाऱ्या कायद्याला एकापाठोपाठ एक असे तीन अध्यादेश आणून भांडवलदारांच्या हितासाठी बदलण्याचा प्रयत्न केला, हे खरं नाही का?
3. फेब्रुवारी 2015 मध्ये आपण सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र देऊन, शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर 50 टक्क्यापेंक्षा अधिक किमान आधारभूत किंमत दिल्यास बाजारात विसंगती येईल, असं सांगितलं, हे खरं नाही का? याचाच अर्थ तुम्ही भांडवलदाराच्या बाजूने उभे होतात.
4.पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून 2016 पासून 2019 पर्यंत खासगी कंपनींना 26,000 कोटी रुपयांचा नफा मिळवून देण्यात आला, हे खरं नाही का? अन्यथा तो पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असता.
5. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 6 हजार रुपये दिल्याचं ढोल वाजवून सांगत आहात. पण, दुसरीकडे 15,000 प्रति हेक्टर शेतीवर टॅक्स लावण्यात आलाय. त्याचं काय?
6. गेल्या 73 वर्षांत पहिल्यांदाच शेतीवर टॅक्स लागलाय, हे खरं नाही का?. खतांवर 5 टक्के आणि किटकनाशक, औषधांपासून ते कृषी यंत्रावर 12 टक्के ते 18 टक्के टॅक्स लावण्यात आलाय.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाल यांनी ट्विट करुन प्रश्नांची मालिकाच जनतेसमोर ठेवली आहे. या प्रश्नातून मोदींना सवाल करण्यात आला आहे. मोदींनी राज्यसभेत दिलेल्या भाषणानंतरची ही काँग्रेसची प्रतिक्रिया आहे. सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटमध्येही हॅशटॅग असे लिहिले आहे.
3/n
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) February 8, 2021
भारत की आँखे खोल देने वाले कुछ सवालों के जवाब दीजिये -:
2) क्या ये सही नहीं कि मोदी सरकार ने दिसंबर 2014 में किसानों के हक़ के भूमि के ‘उचित मुआवज़ा कानून’ को एक के बाद एक तीन अध्यादेश लाकर पूंजीपतियों के हक़ में बदलने की षड्यंत्रकारी कोशिश की?#RajyaSabhahttps://t.co/Wq3RmAq9Cy