मोदी डोकलाम प्रश्नावरून चीनशी रोखठोक बोलण्याची हिंमत दाखवतील का? काँग्रेसचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 11:43 AM2018-04-27T11:43:07+5:302018-04-27T11:46:42+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीन दौऱ्यावर असून, तेथे ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करणार आहे. मात्र या भेटीपूर्वीच काँग्रेसने मोदींवर घाणाघात करत प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीन दौऱ्यावर असून, तेथे ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करणार आहे. मात्र या भेटीपूर्वीच काँग्रेसने मोदींवर घाणाघात करत प्रश्नांची सरबत्ती केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या भेटीदरम्यान होणाऱ्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या रणनीतिक हितांचे रक्षण करून डोकलामबाबत चीनकडे रोखठोक विचारणा करतील का? अशी विचारणा केली आहे.
सुरजेवाला म्हणाले की भारत सध्या चीनच्या आक्रमक आणि विस्तारवादी धोरणाचा सामना करत आहे. "चीन सिलीगुडी कॉरिडॉरमध्ये डोकलामच्या दक्षिणेस चिकन नेक जवळ एक नवा रस्ता बांधत आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना याची गंधवार्ता नसल्याचेच दिसत आहे. ते चीनला कठोर संदेश का देऊ शकत नाहीत, कुणास ठावूक."
As Modiji 'hugs' his friend, President, Xi Jinping today in Wuhan, China, will he remember his innate duty to protect India’s strategic interests & question China on occupation of #Dokalam impacting India’s National Security?
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) April 27, 2018
1/n
सुरजेवाला यांनी यासंदर्भात एक सॅटेलाइट फोटोही ट्विट केला आहे. " हे छायाचित्र 25 एप्रिल 2018 चे असून, हे छायाचित्र सांगते की भारतीय लष्करी तळापासून काही मीटर अंतरावर चीनने बांधकाम केले आहे. याविरोधात पंतप्रधान आणि संरक्षण मंत्रालयाने याची दखल घेतली आहे का? मोदी आज होणाऱ्या मुळाखतीत चिनी राष्ट्राध्यक्षांसमोर हा प्रश्न उपस्थित करणार का? मोदी डोकलाम मुद्द्यावर भारताचे हित विचारात घेऊन चीनसोबत रोखठोक चर्चा करण्याची हिंमत दाखवणार का?" असे सवाल सुरजेवाला यांनी केले आहेत.
4/n
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) April 27, 2018
Doesn’t the latest ‘Satellite Imagery’ from Google Maps of 25th April, 2018 show creation of additional structures by China meters away from Indian Army posts? Has PM & Defense Ministry taken note of it? pic.twitter.com/jKzM7AsXwt
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी रात्री उशिरा चीनच्या मध्यवर्ती भागांत असलेल्या वुहान शहरात पोहोचले आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यात 24 तासात सहा वेळा मोदी व जिनपिंग यांच्यात बैठका होणार आहेत. मोदी व जिनपिंग यांच्याच होणाऱ्या बैठकींमधील दोन महत्त्वाच्या बैठकांमध्ये दोन्ही देशातील सहा-सहा सदस्यांचं शिष्टमंडळही सहभागी होणार आहे. शुक्रवारी या दोन्ही बैठका पार पडणार आहेत. यातील पहिली भेट ही हुवई प्रॉर्विस म्युझियममध्ये होईल. तर दुसरी बैठक इस्ट लेक किनाऱ्याच्या गेस्ट हाऊसमध्ये होइल. यानंतर रात्री जेवणाच्या दरम्यानही दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार,या बैठकीला उच्चस्तरीय चर्चा म्हणणं चुकीचं ठरेल. या बैठकीसाठी विशिष्ट मुद्दे ठरले नाहीत. आतंकवाद, सीमा वाद असे काही मुद्देही यामध्ये असतील. या अनौपचारिक संवादादरम्यान कुठल्याही करारावर हस्ताक्षर होणार नाही, हे आधीच ठरलेलं आहे. शनिवारी मोदी व जिनपिंग यांच्यात 3 बैठका होणार आहेत.
5/5
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) April 27, 2018
Will PM Modi take up the issue in the ‘Summit’ with Chinese President today in Wuhan, China?
Modiji may not be able to show ‘red eyes’ as he loftily promised, but will he show the courage of conviction to do plain-speaking on #Doklam & defend India’s interests?