माझ्या मुलांना रोजगार कसा मिळेल? याची मलला चिंता नाही. माझा कुठलाही मुलगा राजकारणात नाही. मी त्यांना सांगितले आहे की, माझ्या पुण्याईवर राजकारणात येऊ नका. तुम्हाला जर राजकारणात यायचेच असेल, तर पोस्टर चिटकवा, भिंती रंगवा आणि जनतेत जा. माझ्या जो वारसा आहे त्यावर आणि मी केलेल्या कामांवर जर कुणाचा अधिकार असेल तर तो भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आहे, असे केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
गरिबी संपवणे हेच ध्येय -भाजपने नितिन गडकरी यांना नागपूर लोकसभा मतदार संघातून सलग तिसऱ्यांता तिकीट दिले आहे. गडकरी म्हणाले, लोकांना छोट्यात-छोट्या पद्धतीने मदत करण्याची आणि त्यांच्या आयुष्यात पॉझिटिव्ह बदल घडवून आणण्यासाठी काम करत रहण्याची आपली इच्छा आहे. तसेच, रोजगार निर्मिती आणि गरीबी संपवण्याचे लक्ष्य घेऊन मोदी सरकार काम करत आहे.
गडकरी म्हणाले, निवडणूक प्रचारादरम्यान आपण प्रत्येक घरी, प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचणार. मी पोस्टर, बॅनर आणि प्रलोभनांवर विश्वास ठेवत नाही. मी लोकांना भेटेन, त्यांच्यासोबत संवाद साधेन आणि त्यांचा आशीर्वाद मागेन. नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी काम सुरू ठेवण्याची माझी इच्छा आहे.
या क्षेत्रात अधिक संधी -यावेळी वॉटर ट्रांसपोर्ट, पोर्ट, ब्रॉड गेज मेट्रो, रोपवे, केबल कार, फनिक्युलर रेल्वे आणि स्काय बस सेक्टर्समध्ये मोठ्या प्रमाणावर संधी आहेत, असेही गडकरी यावेळी म्हणाले.