ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.21 - दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रीय मंत्री स्मृती इराणींबाबत केंद्रीय माहिती आयोगाने (CIC) दिलेल्या आदेशावर स्थगिती आणली आहे. स्मृती इराणींच्या 10 वी आणि 12 वीच्या गुणपत्रिका सार्वजनिक करावी असा आदेश केंद्रीय माहिती आयोगाने दिला होता. त्याविरोधात सीबीएसई बोर्डाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
विद्यार्थ्याची गुणपत्रिका ही त्या विद्यार्थ्याची खासगी गोष्ट असते, विद्यार्थ्याच्या परवानगीशिवाय गुणपत्रिका सार्वजनिक करता येणार नाही, असं म्हणत उच्च न्यायालयाने केंद्रीय माहिती आयोगाच्या आदेशाला स्थगिती दिली.
यापुर्वी इराणींच्या पदवीप्रकरणी पटीयाला हाउस कोर्टाने याचिका फेटाळली होती.