नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची पुन्हा एकमताने निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक दिल्लीत पार पडली. यात हा निर्णय घेण्यात आला. यावेळी बोलताना शरद पवारांनी केंद्र सरकारवर शेलक्या शब्दात टिका केली. तसेच, शिवाजी महाराज हे आपले प्रेरणास्थान असून त्यांनी आपणास एक गोष्ट शिकवली आहे, ती म्हणजे दिल्लीसमोर झुकणार नाही, असे म्हणत शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारला खडेबोल सुनावले.
'छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आम्हाला प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला गोष्ट शिकवली आहे, दिल्ली समोर झुकणार नाही, असे पवार म्हणाले. तसेच, केंद्र सराकरचा महिला धोरण, शेतकऱ्यांचे प्रश्न, तीन काळे कायदे, भारत-चीन सीमारेषेवरील समस्या, देशात वाढत असलेल्या महागाईवरही पवारांनी भाष्य केलं.
देशात महागाई वाढली असता. भाजपचे नेते देश पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाल्याचा दावा करतात पण इंग्लंडला मागे ढकल्याचा दावा करतात मात्र भारताचे दरडोई उत्पन्न इंग्लंडच्या तुलनेत फार कमी आहे, अशी दुसरी बाजूही पवारांनी सांगितली.
शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड
शरद पवार यांची निवड एकमताने झाल्याची माहिती पक्षाचे ज्येष्ठ खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली. देशापुढे असलेल्या विविध समस्यांवर सदस्यांनी या बैठकीत प्रस्ताव मांडले. त्यावरही सविस्तर चर्चा झाली. महागाई, ओबीसी आरक्षण, विरोधी पक्षांच्या नेत्यांवर जाणीवपूर्वक तपास यंत्रणाद्वारे केली दडपशाहीच्या विरोधात आवाज उठविण्याची आवश्यकता असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे.