नवी दिल्ली : दहशतवादविरोधी यूएपीए कायद्यान्वये दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यूजक्लीकचे संस्थापक प्रबीर पूरकायस्थ व त्या पोर्टलचे मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख अमित चक्रवर्ती यांना केलेली अटक तसेच पोलिस कोठडीत केलेली रवानगी या निर्णयांत हस्तक्षेप करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. यासंदर्भात दोन आरोपींनी केलेली याचिकाही उच्च न्यायालयाने फेटाळली.
अटकेची कारणे लेखी स्वरूपात द्यावीत’ -न्यायाधीश तुषार राव गेडेला म्हणाले की, न्यूजक्लिकचे प्रकरण अतिशय संवेदनशील असून अशा प्रकरणांत पोलिसांनी आरोपीला अटकेची कारणे लेखी स्वरूपात कळविली तर ते योग्य राहील.