शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
5
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
6
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
7
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
8
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
9
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
10
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
11
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
12
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
14
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
15
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
16
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
17
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
18
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
19
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
20
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

बँकबुडव्यांना सोडणार नाही : मोदींचा इशारा

By admin | Published: March 28, 2016 3:47 AM

कोणत्याही बँकबुडव्याला सोडले जाणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील रंगापाडा येथील प्रचार सभेत दिला. मात्र त्याचवेळी बँकांना बुडवून फरार झालेल्या

रंगापाडा (आसाम) : कोणत्याही बँकबुडव्याला सोडले जाणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील रंगापाडा येथील प्रचार सभेत दिला. मात्र त्याचवेळी बँकांना बुडवून फरार झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्या यांचा अप्रत्यक्ष संदर्भ देत काँग्रेसवर हल्लाबोल केला. जनतेचा पैसा हडपणाऱ्या धनाड्यांना काँग्रेसनेच मदत दिली; याउलट आमच्या सरकारने गजाआड होण्याच्या भीतीमुळे पळून जाऊ लागलेल्या लुटारूंभोवती पाश आळवले आहेत, असेही ते म्हणाले. बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून पसार झालेल्या मल्ल्या यांचे प्रकरण हाताळण्यात अपयश आल्याचे कारण देत विरोधकांनी चौफेर टीका चालविल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी येथील निवडणूक प्रचारसभेत काँग्रेसला लक्ष्य बनविले. काँग्रेसच्या सरकारांनी श्रीमंतासाठी बँका उघडल्या. त्यांचे खिसे भरले. आता या पक्षाला त्याची किंमत मोजावी लागेल. माझ्या बँकांचे कर्ज बुडविणाऱ्यांभोवती पाश आवळले आहेत. आता त्यांना कारागृहात जाण्याच्या भीतीपोटी घाम फुटू लागला असून ते पळून जात आहेत, मात्र कुणालाही सोडले जाणार नाही, असे ते म्हणाले.पाच लाख शेततळी...देशाच्या बहुतांश भागात पाण्याची पातळी खालावत असल्याबद्दल चिंता व्यक्त करताना मोदींनी रविवारी ‘मन की बात’ या आकाशवाणी कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी पाच लाख शेततळी बांधण्याचे काम सुरू असल्याचे नमूद केले.शेतकऱ्यांनी कमी खते आणि अधिकाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. शेतकऱ्यांसाठी असलेल्या अ‍ॅपचा वापर फायदेशीर ठरेल, असे ते म्हणाले. पुढील वर्षी फिफा (१७ वर्षे वयोगटाखालील) जागतिक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी १२५वी जयंती असून, त्यांच्याशी निगडित पाच स्थळांचा कशा प्रकारे विकास केला जात आहे, याची माहितीही त्यांनी दिली.