शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

...तशी चूक पुन्हा करणार नाही : गांगुली

By admin | Published: June 21, 2016 7:08 PM

२००५ मध्ये ग्रेग चॅपेलच्या नावाची शिफारस करण्याची चूक केली होती, पुन्हा अशा प्रकारची चूक करणार नाही

ऑनलाइन लोकमत

कोलकाता, दि. 21- सौरव गांगुली यांच्याकडे टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाची निवड करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. २००५ मध्ये ग्रेग चॅपेलच्या नावाची शिफारस करण्याची चूक केली होती, पुन्हा अशा प्रकारची चूक करणार नाही, असे गांगुलीने म्हटले आहे. चॅपेल भारतीय संघाचे प्रशिक्षक झाल्यानंतर त्यांचे गांगुलीसोबत संबंध विशेष चांगले नव्हते. त्याच कालावधीत गांगुलीला राष्ट्रीय संघाच्या कर्णधारपदावरून हटविण्यात आले होते. ए सेंच्युरी इट नॉट इनफ या त्याच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलतान गांगुली म्हणाला, मला एकदा प्रशिक्षकाची निवड करण्याची संधी मिळाली होती. माझ्या मते मी २००५ मध्ये चॅपेल यांच्या नियुक्तीच्या वेळी चूक केली होती. मला पुन्हा संधी मिळाली आहे. मी एकदा मुलाखत (चॅपेल यांची) घेतली आहे आणि त्याचा निकाल चांगला नव्हता.क्रिकेट सल्लागार समिती यावेळी योग्य व्यक्तीची निवड करेल, अशी गांगुलीला आशा आहे.गांगुली म्हणाला, यावेळी योग्य व्यक्तीची प्रशिक्षकपदी निवड होईल, अशी आशा आहे. ती व्यक्ती कुणीही असू शकते. मला सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, बीबीसीआयचे सचिव अजय शिर्के आणि अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचा पाठिंबा आहे, हे मी माझे सुदैव समजतो. आम्ही सर्वानुमते योग्य व्यक्तीची निवड करण्यात यशस्वी ठरू, असा विश्वास आहे.गांगुली पुढे म्हणाला, प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास अडीच वर्षांपूर्वी मी स्वत: या पदाबाबत विचार करीत होतो आणि आज मी कुणा एकाची या पदासाठी निवड करणार आहे. जीवन असेच असते. मी मुलाखत दिली नाही, पण एक दिवस नक्की मुलाखत देईल. गांगुलीने सांगितले की, जीवनात काहीच निश्चित नसते. आगामी दोन वर्षांत काय घडेल हे कुणीच सांगू शकत नाही. मी बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होईल आणि विश्व टी-२० स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे यजमानपद भूषवेल, याचा कुणी विचार केला नव्हता. हे जीवन असून वाटचाल करावी लागते.माजी कर्णधार गांगुली म्हणाला की, सोमवारी रात्री मला झोप आली नाही. कारण मंगळवारी मला प्रशिक्षकपदासाठी मुलाखत घ्यायची होती. हा अनुभव काही अंशी १९९६ मध्ये इंग्लंडविरुद्ध लॉडर्स्् मैदानावर कसोटी पदार्पणाच्या पूर्वी होता तसाच होता, असेही गांगुलीने सांगितले. गांगुली म्हणाला, सोमवारी सर्व जण झोपत असताना मला मात्र झोप येत नव्हती. मी त्यावेळी लॉर्डस्वर झळकावलेल्या शतकाचा युट्यूबवर व्हिडीओ बघितला. हा १२ मिनिटांचा व्हिडीओ आहे. त्यानंतर मला झोप आली. मी साधारण व्यक्ती असून आपल्या व्यवसायात चांगले कार्य करण्यास इच्छुक आहे. त्या रात्री लॉर्डस्वर माझ्यातील आत्मविश्वास जागृत झाला. जर मी मेहनत केली तर पुढील १० वर्षे खेळू शकतो, असे मला वाटले.लॉर्डस्वरच्या शतकानंतर झालेली पत्रकार परिषद माझ्या चांगल्या आठवणीत आहे. याबाबत बोलताना गांगुली म्हणाला,ह्यपहिला प्रश्न होता, तुम्ही तुमच्या टीकाकारांना गप्प केले, याबाबत काय सांगाल? त्यावेळी माझ्या डोक्यात एकच विचार आला की मी या लायकीचा आहे?