शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकहिताचा निर्णय रद्द कराल, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल; CM शिंदे यांचा विरोधकांना इशारा
2
Video - भयंकर! नायजेरियात पेट्रोलचा टँकर उलटल्याने भीषण अपघात; १४७ जणांचा मृत्यू
3
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, येणी वसूल होतील; मन प्रसन्न होईल, शुभ फलदायी दिवस
4
संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम
5
आतापर्यंत 1,658 महिला लढल्या, पण विजयी झाल्या फक्त 161
6
विधानसभा जिंकू आणि सत्ता आणू : राज ठाकरे
7
महायुती सरकारचे विकासाचे दावे खोटे; नाना पटोलेंची टीका
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्ता ३% वाढला
9
जीआरमुळे आचारसंहिता भंग झाली का, ‘व्होट जिहाद’ शब्दही तपासणार - चोक्कलिंगम 
10
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली; हातात तलवारीऐवजी संविधान!
11
काँग्रेसची ६० नावे निश्चित! छाननी समितीची दिल्लीत चर्चा; २० तारखेनंतर येणार पहिली यादी
12
शेतकऱ्यांना माेठा दिलासा, सरकारने वाढविले दर; गव्हाच्या एमएसपीमध्ये १५० रुपये वाढ
13
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
14
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
15
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
16
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
17
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
18
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
19
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा

रुग्ण वाढणार की स्थिती नियंत्रणात येणार?; कोरोनाबाबत सर्वांचे दावे वेगवेगळे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 10:54 PM

जुलैमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढेल किंवा त्याचा उच्चांक होईल, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले होते. त्यांचा दावा खरा ठरताना दिसत आहे.

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : कोरोनाच्या उद्रेकाबाबत सर्वांचे दावे चुकीचे ठरले आहेत. कारण काहीही असले तरी तज्ज्ञांच्या दाव्यांनी सरकार व जनतेची दिशाभूल केली. कोरोना कसा वाढेल, त्याची वाटचाल कशी असेल, याबाबत कोणालाच माहिती नाही. १७ जुलैपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १० लाखांच्या पलीकडे जाईल, असे कोणीही म्हटले नव्हते. जुलैमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढेल किंवा त्याचा उच्चांक होईल, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले होते. त्यांचा दावा खरा ठरताना दिसत आहे.

कोरोना उद्रेकाच्या उच्चांकाबाबत कोण काय म्हणाले?

नॅशनल टास्क फोर्सचे अध्यक्ष व नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणतात की, देशातील काहीच भागांमध्ये विशेषत: दाट लोकसंख्येच्या भागात स्थिती वाईट आहे. अनेक भाग संक्रमित नाहीत. संपूर्ण देश प्रभावित झाला, असे म्हणता येणार नाही.डॉ. रणदीप गुलेरिया म्हणतात की, चाचण्या वाढवल्याने रुग्णसंख्येत वाढ होईल. आॅगस्टपर्यंत हा वेग कमीही होईल. कदाचित दुसऱ्या टप्प्याचाही सामना करावा लागू शकतो.

आयसीएमआरच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निवेदिता गुप्ता म्हणतात की, भारतात अद्याप कोरोनाचा उच्चांक नाही. कोरोना संक्रमण लोकल ट्रान्सफर स्टेजमध्ये आहे.

१) ११ एप्रिल रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले होते की, लॉकडाऊन व कंटेन्मेंट केले नाही तर रुग्णांची संख्या १५ एप्रिल रोजी ८ लाख २० हजार झाली असती. देशात केवळ कंटेन्मेंट केले तर १५ एप्रिलपर्यंत १.२० लाख रुग्ण झाले असते. देशात या दिवसापर्यंत ७५२८ रुग्ण होते. ६४३ बरे झाले व २४२ मृत्यू झाले. (दावा चुकीचा)

२) राष्ट्रीय टास्क फोर्स आणि ग्रुप ऑफ इम्पॉवरमेंटचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी २२ मे रोजी म्हटले होते की, देशात ३७ हजार ते ७८ हजार मृत्यू होऊ शकले असते. घराची लक्ष्मण रेषा आम्ही पार केली नाही म्हणून हे टळले. त्यावेळी देशातील रुग्णांची संख्या १,१८,४४७ होती. त्यातील ६६,३३० सक्रिय रुग्ण होते व ४८,५३४ बरे झाले होते. त्यावेळी ३,५८३ मरण पावले होते. तथापि, त्यांना खुलासा द्यावा लागला होता. (दावा चुकीचा)

आयआयटी मुंबई व सिंगापूर विद्यापीठ म्हणते कोरोना संपेल

1 आयआयटी मुंबईने १३ जुलै रोजी अध्ययनात म्हटले आहे की, २ आठवडे ते २.५ महिन्यांत देशातील राज्यांतून कोरोना संपेल. लस आल्याशिवाय हे शक्य नाही.

2 सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड डिझाईनने २८ एप्रिल रोजी म्हटले होते की, कोरोना जगातून ९ डिसेंबर २०२० पर्यंत जाईल. भारतातून तो २६ जुलैपर्यंत संपेल. हे सध्या तरी अशक्य आहे.

३) ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या मध्यात कोरोनाचा उद्रेक सर्वाधिक असेल, असे आयसीएमआरने १४ जून रोजी म्हटले होते. नंतर म्हटले की, या अभ्यासाशी आमचा संबंध नाही. (दावा चुकीचा)

४) बंगळुरूतील आयआयएससीने १६ जुलै रोजी म्हटले होते की, स्थितीत सुधारणा झाली नाही तर मार्च २०२१ पर्यंत एकूण रुग्णांची संख्या ३७.४ लाखांपर्यंत जाऊ शकते. स्थिती खूपच बिघडली तर ६.१८ कोटी संक्रमित होऊ शकतात.

टॅग्स :Indiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या