प्रशांत किशोरांचा काँग्रेस प्रवेश निश्चित? उद्या पक्षाच्या नेत्यांसोबत करणार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 05:45 PM2022-04-21T17:45:31+5:302022-04-21T17:46:18+5:30

Prashant Kishore : प्रशांत किशोर हे काँग्रेससमोर प्रेझेंटेशनही देणार असून, त्यासाठी त्यांनी 600 स्लाइड्सचे प्रेझेंटेशन तयार केले आहे. प्रशांत किशोर यांच्या जवळच्या सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे.

will prashant kishor join congress meeting with party leaders tomorrow  | प्रशांत किशोरांचा काँग्रेस प्रवेश निश्चित? उद्या पक्षाच्या नेत्यांसोबत करणार चर्चा

प्रशांत किशोरांचा काँग्रेस प्रवेश निश्चित? उद्या पक्षाच्या नेत्यांसोबत करणार चर्चा

googlenewsNext

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोर धरू लागला आहे. दरम्यान, काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रशांत किशोर उद्या पक्षाशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशांत किशोर हे काँग्रेससमोर प्रेझेंटेशनही देणार असून, त्यासाठी त्यांनी 600 स्लाइड्सचे प्रेझेंटेशन तयार केले आहे. प्रशांत किशोर यांच्या जवळच्या सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे.

यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांना सांगितले आहे की प्रशांत किशोर लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, तसेच ते 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार करतील. गेल्या काही दिवसांपासून प्रशांत किशोर हे सोनिया गांधींसह पक्षातील बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

पक्षाच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी मध्य प्रदेश निवडणुकीबाबत कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्याशीही चर्चा केली. बुधवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही दिल्ली गाठली आणि प्रशांत किशोर यांच्यासोबत पक्षाच्या बैठकीत भाग घेतला.

प्रशांत किशोर 2024 च्या रणनीतीवर काम करतील
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रशांत किशोर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाची रणनीती तयार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय ते काँग्रेसच्या आघाडीतील सहयोगींसोबतही चर्चा करतील आणि त्याचा अहवाल सोनिया गांधींना सादर करतील. 

दुसरीकडे, सोनिया गांधी यांनी स्थापन केलेली विशेष समिती काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांसाठी रणनीती तयार करण्यासाठी मार्ग सुचवण्यासाठी 2-3 दिवसांत आपला अहवाल देऊ शकते. काँग्रेसमध्ये प्रशांत किशोर यांच्या भूमिकेबाबतही सूचना केल्या जाणार आहेत.

विशेष समितीने प्रशांत किशोर यांच्या सूचनांचा विचार सुरू आहे, असे काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी सांगितले. ते म्हणाले, काँग्रेस संघटनेने सर्व बदलांशी जुळवून घेतले पाहिजे आणि म्हणूनच ही समिती प्रशांत किशोर आणि विविध अनुभवी नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षांना वेळोवेळी दिलेल्या विविध सूचनांवर गेल्या 15 दिवसांपासून विचारमंथन करत आहे.

Web Title: will prashant kishor join congress meeting with party leaders tomorrow 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.