युक्रेन भेटीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला भेट देणार की नंतर? काँग्रेसचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 02:46 PM2024-07-28T14:46:33+5:302024-07-28T14:49:56+5:30

मणिपूरवर भाजपची सत्ता आहे. जर युक्रेनला भेट दिली, तर फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने हल्ला केलेल्या व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या नेतृत्वाखालील पंतप्रधानांची ही पहिलीच भेट असेल.

Will Prime Minister Narendra Modi visit Manipur before visiting Ukraine or later? Congress criticized | युक्रेन भेटीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला भेट देणार की नंतर? काँग्रेसचा खोचक टोला

युक्रेन भेटीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला भेट देणार की नंतर? काँग्रेसचा खोचक टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युक्रेन दौऱ्यावरून विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसचे  जयराम रमेश यांनी रविवारी पंतप्रधान युक्रेन या युरोपीय राष्ट्राच्या भेटीपूर्वी जातीय संघर्षग्रस्त मणिपूरला भेट देणार का, असा सवाल केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, मणिपूरचे मुख्यमंत्री दिल्लीत नीति आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहतात,ज्याचे  अध्यक्ष पंतप्रधान असतात. यानंतर तेच मुख्यमंत्री पुन्हा भाजपाच्या मुख्यमंत्र्‍यांच्या बैठकीला उपस्थित राहतात. 

भाजपाच्या मुख्यमंत्री परिषदेत देवेंद्र फडणवीसांना मानाचं स्थान; मोदी-शाहांसोबत पहिल्या रांगेत बसले

जयराम रमेश यांनी लिहिले की, “मणिपूरचे लोक हा साधा प्रश्न विचारत आहेत एन. बिरेन सिंह यांनी नरेंद्र मोदींची स्वतंत्रपणे भेट घेऊन मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा केली? एन बिरेन सिंह यांनी नरेंद्र मोदींना युक्रेन भेटीपूर्वी किंवा नंतर मणिपूरला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते का?, असा सवालही त्यांनी केला. 

पंतप्रधान मणिपूरला भेट देत नसल्याची टीका काँग्रेसने केली आहे. मेईतेई आणि कुकी समाजातील संघर्षामुळे राज्यात गोंधळ सुरू आहे. मणिपूरमध्ये पंतप्रधान मोदींच्या भाजपची सत्ता आहे. जर युक्रेन भेट झाली, तर फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने हल्ला केलेल्या व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या नेतृत्वाखालील पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे.

तिसऱ्या कार्यकाळात पंतप्रधानांची रशियाची पहिली द्विपक्षीय भेट रशियाला होती, याचे वर्णन झेलेन्स्की यांनी शांतता प्रयत्नांना विनाशकारी धक्का म्हणून केले. युक्रेन युद्धानंतरही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याबद्दल पाश्चात्य देशांनी टीका केली आहे.

Web Title: Will Prime Minister Narendra Modi visit Manipur before visiting Ukraine or later? Congress criticized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.