कोलकाता : सरकारचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने तुरुंगातील कैद्यांना तुरुंगात राहूनच खासगी कंपन्यांसाठी रीतसर नोकरी करू देण्याच्या एका योजनेवर पश्चिम बंगालचे कारागृह प्रशासन विचार करीत आहे.राज्याचे कारागृहमंत्री अवनीमोहन जोरदर यांनी सांगितले की, ‘जेल इन्कॉर्पोरेटेड’ नावाची स्वत:ची कंपनी स्थापन करण्याचाही विचार असून हे प्रत्यक्षात कसे साकार करता येईल यासाठी कंपनी कायद्यातील तज्ज्ञ आणि चार्टर्ड अकाऊंटन्टस््चाही सल्ला घेत आहोत. (वृत्तसंस्था)>तुरुंगांना कॉर्पोरेट लूक!मंत्री जोरदर असेही म्हणाले की, कैद्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी कैद्यांना व्यिवसायांचे कौशल्य प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली गेली. आता हे सर्व त्याला ‘कॉर्पोरेट लूक’ देण्याचा उद्देश आहे.
कैद्यांनाही आता खासगी नोकऱ्या देणार?
By admin | Published: April 05, 2017 4:49 AM