शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

एक्स्प्रेस फिडरसाठी निधी देणार : शिवतारे

By admin | Published: June 08, 2016 1:50 AM

सासवड : सासवड शहराला पाच दिवसांपासून पिण्याचे पाणी न आल्याने राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी विजेच्या कारणास्तव पाणी देता न आल्याचे या वेळी बैठकीत सांगितले.

सासवड : सासवड शहराला पाच दिवसांपासून पिण्याचे पाणी न आल्याने राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी विजेच्या कारणास्तव पाणी देता न आल्याचे या वेळी बैठकीत सांगितले.
सासवडला पाणीपुरवठा करणार्‍या गराडे आणि घोरवडी या लघुपाटबंधारे प्रकल्पात अपुरा पाणीसाठा असून, आता दोन दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय पालिकेने यापूर्वीच घेतला आहे. त्यात आता गेले ५ दिवस पुरेसा विद्युत पुरवठा नसल्याने पाणी बंद आहे. त्यामुळे वीर धरणात पाणी असूनही केवळ विजेच्या कारणास्तव पाणी बंद असल्याने विंधनविहिरींवर रात्रंदिवस पाण्यासाठी गर्दी होत आहे.
या संदर्भात रविवारी दुपारी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या निवासस्थानी तातडीने घेण्यात आलेल्या बैठकीस मुख्याधिकारी दुर्वास, कर्मचारी भूतकर आणि सासवड महावितरणचे कार्यकारी अभियंता मदन शेवाळे, स्विय सहायक माणिक निंबाळकर, शिवसेना नगरसेवक डॉ. राजेश दळवी, शहराध्यक्ष अभिजित जगताप, सासवड संपर्कप्रमुख सचिन भोंगळे उपस्थित होते.
येत्या दोन दिवसांत तातडीने वीर धरण क्षेत्रावरून सर्वेक्षण करून हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी प्रस्ताव देण्याच्या सूचना सातारा जिल्‘ाचा पालकमंत्री या नात्याने मी दिल्या आहेत. भादे (ता. खंडाळा) येथील सबस्टेशनचे काम येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असे महावितरणच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. दरम्यानच्या कालावधीत एक्स्प्रेस फिडरच्या प्रस्तावावर कार्यवाही केली जाईल. तसेच फिडरसाठी लागणारा निधी लगेच देण्याची विनंती मंत्री बावनकुळे यांना करीत असल्याचे शिवतारे यांनी सांगितले. त्याबाबत सातारा जिल्हा महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
लवकरच शहरास नियमित पाणी पुरवले जाईल, असे मुख्याधिकारी दुर्वास यांनी सांगितले. यात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास दोन दिवस प्रत्येक वॉर्डनिहाय पाण्याचे टँकर देण्यात यावेत, त्याचा खर्च मी देण्याची व्यवस्था करतो, असेही शिवतारे यांनी सांगितले.