मुंबई : उर्जित पटेल यांनी दिलेला राजीनामा आणि त्यांच्या जागी शक्तिकांत दास यांची नियुक्ती, या सर्व घडामोडी रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीच्या तोंडावर घडल्या आहेत. ही बैठक बोलविण्याचा अधिकार गव्हर्नरांना असतो. त्यामुळे ते येत्या शुक्रवारी १४ डिसेंबरला बैठक बोलवणार का? याबाबत उत्सुकता आहे. रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची दर महिन्याला बैठक होते. पटेल यांचा केंद्र सरकारशी असलेल्या वादामुळे मागील महिन्यातील बैठक चांगलीच गाजली होती.अतिरिक्त निधी सरकारला देण्यावरुन केंद्र सरकार नियुक्त सचिवांनी बैठकीत पटेल यांना घेरले होते. यासंबंधी समिती स्थापन करण्याचा निर्णय त्या बैठकीत घेण्यात आला होता. पण या समितीच्या सदस्यांवरुन पटेल आणि सरकारमध्ये वाद निर्माण झाल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आता १४ तारखेला संचालकांची बैठक आहे.
रिझर्व्ह बँकेची शुक्रवारी बैठक होणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 1:44 AM