बळी गेल्यावर रस्ता सुधारणार का?
By admin | Published: July 21, 2016 10:23 PM
नशिराबाद : गावातील प्रमुख रस्त्यांची प्रचंड दैना झाली आहे. रस्त्यांचे काँक्रीटीकरण उखडल्याने मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. अपघात होतो. याबाबत अनेकदा उहापोह होऊनही ग्रामपंचायत मात्र ढिम्म आहे. ग्रामपंचायतीचे आश्वासने फोल ठरल्याने ग्रामस्थ हैराण झाले असून या रस्त्यांचे नशीब कधी पालटणार याच्या प्रतिक्षेत आहे.
नशिराबाद : गावातील प्रमुख रस्त्यांची प्रचंड दैना झाली आहे. रस्त्यांचे काँक्रीटीकरण उखडल्याने मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. अपघात होतो. याबाबत अनेकदा उहापोह होऊनही ग्रामपंचायत मात्र ढिम्म आहे. ग्रामपंचायतीचे आश्वासने फोल ठरल्याने ग्रामस्थ हैराण झाले असून या रस्त्यांचे नशीब कधी पालटणार याच्या प्रतिक्षेत आहे.गावातील दोन प्रमुख रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहे. पोलीस स्टेशनजवळ, पाण्याची टाकी, सातीबाजार उंचआड, युनियन बँक, भवानीनगर, बसस्थानक आदी ठिकाणी खड्डे आहे. ही स्थिती प्रमुख रस्त्यांची असून गल्लीबोळासह न्यू प्लॉट एरियात रस्त्यानची अवस्था दयनीय होत आहे. पोलीस स्टेशनजवळील रस्त्यावर वाहनाचे टायर तर रस्त्याच्या चकोरीत अटकून अपघात झाले आहे. काहींना दुखापत झाल्याच्या घटना आहे. मात्र सुस्त ग्रामपंचायत साधी डागडुजीही करत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. आता काय एखाद्याचा बळी गेल्यावर जाग येणार काय? असा संतप्त प्रश्न ग्रामस्थ करीत आहे. पावसाळ्यात खड्डेंमुळे साचलेल्या पाण्यात खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी अपघात व वाहनांचे नुकसान होते. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.दरम्यान रस्त्यांच्या डागडुजींसह इतर समस्यांबाबत ग्रामपंचायतीला स्मार्ट व्हिलेज समितीने निवेदने दिली. उपोषणाचा इशारा दिला. मात्र ३० जूनपर्यंत रस्त्यांसह सर्व समस्या मार्गी लागतील असे लेखी आश्वासन सरपंच खिलचंद रोटे, ग्रामविकास अधिकारी डी.आर.शिरतुरे यांनी समितीला दिले होते. त्यामुळे उपोषण स्थगित झाले. मात्र महिना उलटल तरीही समस्या जैसे थे च आहे. मूलभूत समस्या कायमच असल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहे. स्मार्ट व्हिलेज समिती व लोकप्रतिनिधी मौन धरून बसले आहे.पावसाळा सुरू झाला असूनही रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत अनास्था का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)