नितीन अग्रवाल, नवी दिल्लीसेक्स सीडी प्रकरणात तुरुंगाची हवा खात असलेले दिल्लीचे माजी मंत्री संदीप कुमार, त्यांच्या पत्नी आणि स्वीय सचिव प्रवीण यांचे आणखी एक प्रकरण चव्हाट्यावर आल्याने संदीप कुमार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ते अडकण्याची शक्यता आहे.सूत्रानुसार ‘पती, पत्नी और वह’ असा काहीसा हा प्रकार आहे. संदीप कुमार यांनी आपल्या नवजात मुुलाला अमेरिकेचे नागरिकत्व मिळवून देण्यासाठी काय काय केले. एवढेच नाही तर सरकारी पैसाही यासाठी खर्च केला. पोलीस आता या प्रकरणाची गुन्हे शाखेकडून चौकशी करीत आहेत.दोन दिवसांपूर्वी संदीप कुमार यांनी आपले विश्वासू स्वीय सचिव प्रवीण कुमारवर ब्लॅकमेलिंगचा आरोप केला होता. प्रवीणवर एवढा भरवसा होता की, संदीप कुमारने आपल्या गर्भवती पत्नीची प्रसूती आणि जन्माला येणाऱ्या बाळाची जबाबदारी प्रवीणवर सोपविली होती.संदीप २२ एप्रिल रोजी पत्नीसोबत कुवैत एअरलाईन्सने अमेरिकेला गेला. पत्नी गर्भवती असल्याची माहिती मात्र त्याने अमेरिका दूतावासात दिलीच नाही. नंतर ३ मे रोजी त्याने प्रवीणलाही न्यूयॉर्कला बोलावून घेतले. सरकारी खर्चाने प्रवीण न्यूयॉर्कला गेला. पत्नीची प्रसूती आणि जन्माला येणाऱ्या बाळाची जबाबदारी प्रवीणवर सोपवून संदीप ६ मे रोजी दिल्लीला परतले. प्रवीणने जबाबदारी पाळत रितूला एल्महर्स्ट इस्पितळात दाखल केले. १० जून रोजी रितूने मुलाला (रुद्रप्रताप सिंह) जन्म दिला. रितू आणि नवजात बाळाची प्रवीण सरकारी खर्चाने देखभालकरीत होता.
संदीप कुमार भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकणार?
By admin | Published: September 09, 2016 3:50 AM