शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

"बायडेन यांची मदत घेणार, काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करणार" काँग्रेस नेत्याची मुक्ताफळे

By बाळकृष्ण परब | Published: November 11, 2020 10:34 AM

Article 370 News : नॅशनल कॉन्फ्रन्स, पीडीपी यांनी गुपकारच्या माध्यमातून कलम ३७० साठी आवाज उठवला असतानाचा काँग्रेसच्या काश्मीरमधील एका नेत्याने या मुद्द्यावरून मुक्ताफळे उधळली आहेत.

ठळक मुद्दे अमेरिकेमध्ये जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचा झालेला विजय हा लोकशाहीचा विजय जम्मू काश्मीरच्या राजकारणावरही याचा सकारात्मक परिणाम होईल बायडेनच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणून जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० आणि कलम ३५ अ लागू करण्यासाठी प्रयत्न करणार

नवी दिल्ली - गेल्या वर्षी केंद्र सरकारने रद्द केलेल्या कलम ३७० वरून गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा वातावरण तापू लागले आहे. एकीकडे नॅशनल कॉन्फ्रन्स, पीडीपी यांनी गुपकारच्या माध्यमातून कलम ३७० साठी आवाज उठवला असतानाचा काँग्रेसच्या काश्मीरमधील एका नेत्याने या मुद्द्यावरून मुक्ताफळे उधळली आहेत. अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत जो बायडेन यांच्या झालेल्या विजयाचा आधार घेत काँग्रेसचे काश्मीरमधील नेते जहांजेब सिरवाल म्हणाले की, आम्ही बायडेनच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणून जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० आणि कलम ३५ अ लागू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.आपल्या व्हिडीओ संदेशामध्ये जहांजेब सिरवाल म्हणाले की, अमेरिकेमध्ये जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचा झालेला विजय हा लोकशाहीचा विजय आहे. याचा परिणाम भारतीय राजकारणावरसुद्धा होणार आहे. तसेच जम्मू काश्मीरच्या राजकारणावरही याचा सकारात्मक परिणाम होईल. सध्या संपूर्ण जगात इस्लामोफोबियाची दहशत पसरवली जात आहे. त्यामध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते. तसेच बायडेन भारत सरकारवर दबाव आणतील त्यानंतर कलम ३७० आणि कलम ३५ अ रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याबाबत निर्णय होऊ शकतो.

दरम्यान, काँग्रेससुद्धा पीपल्स अलायन्सचा भाग असून, जिल्हा विकास परिषदेची निवडणूक एकत्र लढणार असल्याचा दावा जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी रविवारी केला होता. जम्मू काश्मीर काँग्रेसचे प्रमुख जी.ए. मीर यांनी काँग्रेस जिल्हा विकास परिषदेची निवडणूक एकत्र येऊन लढेल, असे मला सांगितले असे फारूख अब्दुल्ला म्हणाले होते.फारुख अब्दुल्लांनी केलेल्या दाव्याबाबत मीर म्हणाले की, सर्व निवडणुका एकत्र होत आहेत. तसेच वेळसुद्धा कमी आहे. पक्षाने अद्याप उमेदवार निश्चित केलेले नाहीत. स्वबळावर निवडणुका लढवण्याचा विचार सुरू आहे. मात्र काही ठिकाणी आघाडी करून निवडणूक लढवण्यात येईल.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Article 35 Aकलम 35-एIndiaभारतcongressकाँग्रेसJoe Bidenज्यो बायडन