शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
2
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
3
"स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर...", ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, भाजपाला सवाल
4
“बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावे”; जयंत पाटील यांची खुली ऑफर
5
जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
6
"'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव"
7
दिल्ली सरकारच्या नव्या कॅबिनेटचं चित्र स्पष्ट, आतिशी यांच्यासह हे ५ मंत्री घेणार शपथ
8
लाच म्हणून मर्सिडीज, महिलेला दरमहिना २ लाख; IAS अधिकाऱ्याबाबत धक्कादायक खुलासा
9
मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!
10
Rate Cut चं सर्वसामान्यांना काय देणं-घेणं?; तुमच्या मासिक खर्चावर होतो थेट परिणाम
11
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
12
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
13
पितृपक्ष: श्राद्ध, तर्पण विधी करताना ‘हे’ ८ मंत्र म्हणा, ठरतील उपयुक्त; पाहा, मान्यता
14
काश्मीर, कलम ३७० बाबत पाकिस्तान, काँग्रेस-NC सोबत, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा
15
मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण
16
IND vs BAN : जैस्वालची 'यशस्वी' खेळी; फिफ्टीसह खास विक्रमाला घातली गवसणी
17
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
18
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
19
पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल!
20
कुछ बडा होने वाला है...! तेजस्वी यादवांनी बोलावली आमदार-खासदारांची तातडीची बैठक

'आता काय भारताच्या ध्वाजातूनही रंग हटवणार का?' ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर भाजप भडकला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 10:39 PM

ममता गलिच्छ राजकारण करत असल्याचे भाजपने म्हटले आहे...

विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर, आता याच मुद्द्यावरून राजकारण सुरू झाले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी अंतिम सामन्याच्या ठिकाणावर प्रश्न उपस्थित करत, हा सामना कोलकाता अथवा मुंबईत झाला असता, तर भारत जिंकला असता, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर, भाजप नेतेही आक्रमक झाले आहेत. ममता गलिच्छ राजकारण करत असल्याचे भाजपने म्हटले आहे.

ही निवडणूक नाही, खेळ आहे -यासंदर्भात बोलताना भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले, - "ममता बॅनर्जी घाणेरडे राजकारण करत आहेत, याचे मला वाईट वाटते. आमच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करत 11 पैकी 10 सामने जिंकले. ही निवडणूक नाही, खेळ आहे. आता पक्ष आणि राज्यांच्या नावावर विभाजन केले जात आहे. गुजरातमध्ये सामना खेळवला गेला, म्हणून तेथील लोक वाईट आहेत, अशी ममता बॅनर्जींची मानसिकता आहे. भगव्या रंगाचे कपडे परिधान केले म्हणून आपला पराभव झाल्याचे ममता म्हणत आहेत. भगवा रंग तर आपल्या ध्वजातही आहे, आता काय भारताच्या ध्वजातूनही रंग काढणार का?"

भाजप सरचिटणीस तथा आमदार अग्निमित्रा पॉल यांनीही ममतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, "ममता बॅनर्जी आणि राहुल गांधींसारख्या नेत्यांकडूनच अशा गलिच्छ राजकारणाची अपेक्षा केली जाऊ शकते. या नेत्यांनी भारतीय संघाच्या प्रयत्नांचा अवमान केला आहे. भारतीय संघाने सलग 10 सामने जिंकले. त्यांच्या प्रयत्नांचे काय? त्याही त्याच काँग्रेसचा भाग होत्या, हे ममता विसरत आहेत."

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाICC One Day World Cupवन डे वर्ल्ड कप