असिफ कुरणेचेन्नई : तामिळनाडूतील शिवगंगा मतदारसंघ हा माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला बनवला आहे. २०१४ चा अपवाद वगळता येथे सात वेळा चिदंबरम विजयी झाले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा मुलगा कार्ती पी. चिदंबरम यांनी मोठ्या मताधिक्याने ही निवडणूक जिंकली होती. आतापर्यंत आठ वेळा काँग्रेसने ही जागा जिंकली आहे तर दोन वेळा अण्णाद्रमूक पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे.
यावेळी या मतदारसंघात काँग्रेस, अण्णाद्रमुक, भाजप अशी तिरंगी लढत होत आहे. कार्ती यांना यावेळी आण्णा द्रमूकच्या झेविअर दास व भाजपच्या डॉ. देवनाथन यादव यांचे तगडे आव्हान आहे. शिवगंगामध्ये चेट्टीयार या व्यापारी समाजाचे प्रभूत्व असून त्याचे मतदान १० टक्केपेक्षा जास्त आहे. २०१४ च्या निवडणुकीत कार्ती चिदंबरम चौथ्या नंबरवर फेकले गेले होते. त्यानंतर त्यांनी पुनरागमन करत २०१९ ला विजय मिळवला.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
या मतदारसंघात निवडणूक लढवत असलेले तिन्ही प्रमुख पक्षाचे उमेदवार करोडपती असून भाजपच्या देवनाथन यादव यांनी ३०० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. मतदारसंघात वस्रोद्योग, राईस मिल, ग्राफाईट मायनिंग, कृषी उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. मात्र जीएसटीमुळे वस्त्रोद्योग, राईस मिलचे कंबरडे मोडले आहे. द्रमूक सरकारकडून देखील त्यात फारशी सुधारणा झालेली नाही. स्थानिक तरुणांना रोजगार मिळत नाही. राईस मिल, इतर उद्योगात युपी, बिहारची मुले कमी पैशावर काम करतात. त्याचा फटका स्थानिक युवकांना बसत आहे. याबाबत मोठ्या प्रमाणात असंतोष आहे.
२०१९ मध्ये काय घडले?कार्ती पी. चिदंबरम काँग्रेस (विजयी) ५,६६,१०४ एच. राजा भाजप २,३३,८६० व्ही. पांडी अपक्ष १,२२, ५३४व्ही. शक्तीप्रिया एनटीके ७२,२४०
२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?
वर्ष विजयी उमेदवार पक्ष मते टक्के२०१४ पीआर. सेन्थलीनाथन अण्णाद्रमूक ४,७५, ९९३ ४७%२००९ पी. चिदंबरम काँग्रेस ३,३४,३४८ ४३%२००४ पी. चिदंबरम काँग्रेस ४,००,३९३ ६०%१९९९ सुदर्शना नच्चीपन काँग्रेस २,४६,०७८ ४०%१९९८ पी. चिदंबरम ता.म. काँग्रेस ३,०३,८५४ ५१ %