वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सोमवारी भारत दौºयावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ते धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करणार आहेत. याशिवाय नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीसह (एनआरसी) काश्मीरचा मुद्दाही या चर्चेत उपस्थित होऊ शकतो.व्हाइट हाउसने सांगितले की, अमेरिकेतील संस्था ‘युनायटेड स्टेटस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियन्स फ्रीडम’ने एका पत्रकात म्हटले की, सीएए भारताच्या धार्मिक स्वातंत्र्यात घसरण दाखवत आहे. एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला की, ट्रम्प हे लोकशाही परंपरा व धार्मिक स्वातंत्र्याबाबत बोलणार आहेत.सीएए, एनआरसीबाबत ट्रम्प मोदींशी चर्चा करणार का? यावर अधिकारी म्हणाला की, भारताच्या लोकशाही परंपरांचा आम्ही सन्मान करतो. राष्ट्रपती, पंतप्रधानांसोबत बैठकीत हे मुद्दे चर्चेसाठी येऊ शकतात. धार्मिक अल्पसंख्याकांचा सन्मान राखण्यासाठी जग भारताकडे पाहत आहे. ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प हे २४ व २५ रोजी अहमदाबाद, आग्रा आणि नवी दिल्लीत जाणार आहेत. (वृत्तसंस्था)
सीएए, एनआरसीसह काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणार ट्रम्प?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 4:50 AM