शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

पाच वर्षांत तुमची नोकरी जाणार का?; क्लार्क, कॅशिअर्सच्या नोकऱ्या घटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 8:12 AM

भारतातील रोजगारांचे स्वरूप बदलून टाकण्यात एआय आणि मशीन लर्निंग विशेषज्ञ, डेटा विश्लेषक, तसेच वैज्ञानिक महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत

अत्याधुनिक तंत्रज्ञान, आयटी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांच्या वापरामुळे कंपन्यांमधील उत्पादन प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ या घटकांवर आमूलाग्र परिणाम होत आहेत. याचेच प्रतिबिंब वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या फ्युचर जॉब्स २०२३ या अहवालात उमटलेले दिसते. या अहवालानुसार येत्या ५ वर्षांत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ६.९ कोटी नवे रोजगार उपलब्ध होतील, तर ८.३ कोटी लोक यामुळे बेकार होतील. 

भारतातील रोजगारांचे स्वरूप बदलून टाकण्यात एआय आणि मशीन लर्निंग विशेषज्ञ, डेटा विश्लेषक, तसेच वैज्ञानिक महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत. देशातील ६१ टक्के कंपन्यांना असे वाटते की, नव्या धोरणांमुळे रोजगारांमध्ये वाढ होईल. नव्या तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या संधी वाढतील, असे ५९ टक्के कंपन्यांना वाटते, तर डिजिटलच्या व्यापक वापरामुळे नोकऱ्या वाढतील असे ५५ टक्के कंपन्यांना वाटते. 

शिक्षण आणि शेतीमध्ये संधी nशिक्षण क्षेत्रात १० टक्के रोजगार वाढीमुळे तब्बल ३० लाख नवे रोजगार निर्माण होतील. nकृषी विशेषज्ञ, उपकरणे, तसेच अवजारे यांचे ऑपरेटर आदी नोकऱ्यांमध्ये एक तृतीयांशने वाढ होईल.  nई- कॉमर्स विशेषज्ञ, डिजिटल मार्केटिंग,  स्ट्रॅटेजी स्पेशालिस्ट आदी नोकऱ्यांमध्ये ४० टक्के नव्या संधी निर्माण होतील. 

असे चित्र बदलणार (प्रमाण %मध्ये) प्रभाव टाकणारे घटक     भारत    जग एआय व मशीन लर्निंग विशेषज्ञ    ३८    ४० डेटा विश्लेषक आणि वैज्ञानिक    ३३    ३४ बिझनेस डेव्हलपमेंट प्रोफेशनल्स    २४    २४ प्रोजेक्ट मॅनेजर्स    २२    २५     (स्रोत : डब्ल्यूडब्ल्यूएफ) 

क्लार्क, कॅशिअर्सच्या नोकऱ्या घटणार

येत्या काळात क्लाउट कम्प्युटिंग, बिग डेटा आणि एआयसारख्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे काही विद्यमान नोकऱ्यांवर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. क्लार्क, कॅशिअर्स, डेटा एंट्री ऑपरेटर्स, अकाउंटिंग व बुक कीपिंगमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या नव्या तंत्रज्ञानामुळे धोक्यात येणार आहेत.