केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यासाठी आणखी तीन आठवड्यांचा कालावधी बाकी असताना यंदाच्या बजेटमध्ये काय विशेष असेल, याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पगारदारांना इन्कम टॅक्सची मर्यादा वाढविली जाईल किंवा कसे, याविषयी उत्सुकता आहे. केंद्रानेही पगारदारांना खूश करण्यासाठी स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढविण्याचे संकेत दिले आहेत.
स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे काय?
स्टँडर्ड डिडक्शन ही एक निश्चित रक्कम असते. जी वजावटीनंतर कोणीही करदाता आपल्या एकंदर ढोबळ उत्पन्नातून वजा करू शकतो.एखाद्या करदात्याचा एकंदर खर्च स्टँडर्ड डिडक्शनपेक्षा अधिक वा त्याहून कमी असेल तरी करदाता नेमून दिलेल्या स्टँडर्डडिडक्शनलाच आपल्या ढोबळ उत्पन्नातून ती रक्कम वजा करेल. थोडक्यात स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे अशी रक्कम जी आपल्या वेतनाच्या एकूण कमाईतून कापली जाते. त्यावर करपात्र उत्पन्नाचे गणित मांडले जाते.
- सरत्या आर्थिक वर्षात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे आर्थिक गणित फिसकटवले. लोकांच्या वैद्यकीय खर्चांत या कालावधीत प्रचंड वाढ झाली आहे.त्यामुळे सामान्य पगारदात्यांचा विचार करता स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा
- ३० ते ३५ टक्क्यांनी वाढवली जावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
- तसे झाल्यास ही मर्यादा ६५ हजार रुपयांपर्यंत वाढू शकते. त्यामुळे पगारदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.