Sidhu Moose Wala : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या आईने आपल्या मुलाचे सुरक्षा कवच कमी करण्याच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आणि राज्य सरकारला आता राज्याची तिजोरी भरणार का असा सवाल केला. पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला (२७) यांची रविवारी भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पंजाबमधील मान सरकारने शनिवारीच त्यांची सुरक्षा काढली होती. यापूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. पण, सध्या त्यांच्याकडे केवळ दोन गनमॅन होते. मुसेवाला यांच्यावर मनसा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याठिकाणी त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते.
हल्लेखोरांनी रविवारी भरदिवसा त्यांची हत्या केली. ज्यावेळी हल्ला झाला तेव्हा ते आपल्या महिंद्रा थार जीपनं प्रवास करत होता. पंजाब सरकारनं शनिवारी ४२४ जणांची सुरक्षा कमी करण्याचे किंवा काढण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये मुसेवाला यांचाही समावेश होता.
मंगळवारी मुसेवाला यांच्या अंत्यसंस्काराच्या अगोदर, त्यांच्या घरातील एका व्हिडीओमध्ये मुसेवाला यांच्या आई चरण कौर या “सरकरला संदेश द्यायचा आहे की तुम्ही हिरे गमावत आहात" असं म्हणत असल्याचं ऐकू येत आहे. आमच्या मुलासोबत चार जणांच्या तैनातीनं काय फरक पडतो? आता तुमची तिजोरी भरणार आहे का? तुमचा खजाना भरा, असंही चरण कौर म्हणाल्या. मुसेवाला यांच्या सुरक्षेत यापूर्वी पंजाब पोलिसांचे चार कमांडो तैनात होतेत. त्यानंतर सुरक्षेत कपात करत दोन कमांडोंना हटवण्यात आलं.
सुरक्षा काढल्याने होते चिंतेतआपली सुरक्षा घटविण्यात आल्याने मुसेवाला हे काळजीत होते. पर्यायी उपाययोजनेसाठी त्यांनी आपल्या वकिलांशी चर्चाही केली होती. आपल्या जिवाला धोका असल्याचे त्यांनी सांगितले होते. पंजाब सरकारने कोणतीही नोटीस न देता आपली सुरक्षा कमी केली असून, हे अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा येथून निवडणूक लढविली होती. ‘आप’चे उमेदवार डॉ. विजय सिंगला यांनी त्यांचा पराभव केला होता. आरोग्यमंत्री करण्यात आलेल्या सिंगला यांना अलीकडेच मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात आले होते.