फ्लॅट खरेदी करण्यापेक्षा घर खरेदी करणं कधीही चांगलं, असे जुनी जाणती मंडळी म्हणायची. त्यामागचं कारण म्हणजे ही प्रॉपर्टी ९९ वर्षांनंतर तुमच्याकडून परत घेतली जाऊ शकते. हा नियम प्रत्येक फ्लॅटवर लागू नसला तरी बहुतांश फ्लॅटच्या बाबतीत असं घडतं. याच्यामागे लीजहोल्ड प्रॉपर्टीचा नियम काम करतो. कुठलीही प्रॉपर्टी दोन पद्धतीने खरेदी केली जाते.
तुम्ही ज्या फ्लॅटमध्ये राहता तो दोन्हीमधील कुठल्या प्रकारचा आहे याचा शोध तुम्ही घेतला तर तुम्हाला तो फ्लॅट येणाऱ्या पिढ्यांपर्यंत तुमचाच राहील की, ९९ वर्षांनंतर तुमच्या हातातून निसटून जाईल हे समजेल. लीजहोल्ड आणि फ्रीहोल्ड प्रॉपर्टी काय असते याबाबत आम्ही तुम्हाला थोडी माहिती देतो.अशी कुठलीही रियल इस्टेट प्रॉपर्टी ज्यावर तिच्या मालकाशिवाय अन्य कुणाचाही अधिकार नसतो अशा प्रॉपर्टीला फ्री होल्ड प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. ही प्रॉपर्टी जोपर्यंत विकली जात नाही तोपर्यंत तिच्यावर कुणीही हक्क दाखवू शकत नाही. फ्री होल्ड प्रॉपर्टी सर्वसाधारणपणे महाग असते कारण एकदा तुमच्याकडून फ्री होल्ड प्रॉपर्टी सर्वसाधारणपणे महाग असते. कारण एकदा तुम्ही खरेदी केल्यानंतर ही प्रॉपर्टी पूर्णपणे तुमची होते. यालाच लिजहोल्ड प्रॉपर्टी म्हणतात.
लीजहोल्ड प्रॉपर्टी एका निश्चित वेळेपर्यंत तुमची असते. सर्वसाधारणपणे लीज ३० किंवा ९९ वर्षांची असते. त्यानंतर ती प्रॉपर्टी तिच्या मूळ मालकाला परत मिळते. कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित मालमत्तेची लीज पुन्हा वाढवली जाऊ शकते. त्याशिवाय तिला फ्री होल्ड प्रॉपर्टीमध्येही बदलून घेता येते. मात्र त्यासाठी ड्युटी आणि अन्य शुल्क भरावे लागतात. लीजहोल्ड प्रॉपर्टीचं मूल्य हे लीज संपल्यानंतर संपुष्टात येते. कारण खऱेदी करणाऱ्याला याचे अधिकार कायम मिळत नाही. त्यामुळे ही मालमत्ता फ्रीहोल्ड प्रॉपर्टी स्वस्त असते.