आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंध्र प्रदेश सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. त्यांनी आंध्रच्या तेलगू देसम पक्षावर राजकीय सूडबुद्धीने काम केल्याचा आरोप केला आहे. जगन रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारवर राज्यात हिंसाचार पसरवल्याचा आणि वायएसआरसीपी कार्यकर्त्यांना लक्ष्य केल्याचा आरोप केला. दरम्यान, आता या आंदोलनाला राजकीय वर्तुळातून पाठिंबा मिळत आहे. विरोधी पक्षांकडून पाठिंबा दिला जात आहे. या आंदोलनाला इंडिया आघाडीनेही पाठिंबा दिल्याचे दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि खासदार अखिलेश यादव यांनी रेड्डी यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. यामुळे आता जगन मोहन रेड्डी इंडिया आघाडीसोबत जोणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
अर्थसंकल्पात मोदी सरकारची एक घोषणा, चीनचं टेन्शन वाढणार...! भारताला होऊ शकतो मोठा फायदा
सपा प्रमुख अखिलेश यादव आणि राम गोपाल यादव यांनी जगन मोहन यांच्या आंदोलनात हजेरी लावली, तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी आणि अरविंद सावंत यांनीही हजेरी लावली. यावेळी टीएमसीचे नजीबुल हक आणि जेएमएमचे विजय हंसडा, आम आदमी पक्षाचे नेते राजेंद्र पाल गौतम आणि एआयएडीएमके नेते थंबी दुराई हेही रेड्डी यांना पाठिंबा दिला. यादरम्यान, तामिळनाडूच्या व्हीसीके पक्षाने जगन मोहन यांना इंडिया आघाडीसोबत येण्याचे आवाहन केले.
खासदारांच्या संख्याबळाची आठवण करुन दिली
दुसरीकडे, जगन मोहन रेड्डी यांनी एनडीएकडे १५ खासदार असल्याची आठवण करून दिली. वायएसआरसीपीचे राज्यसभेत ११ खासदार आहेत, तर लोकसभेत टीडीपीच्या खासदारांची संख्या १६ आहे. या पक्षाचे लोकसभेत ४ खासदार आहेत. आमची आणि टीडीपीची ताकद समान आहे, अशी आठवणही त्यांनी करुन दिली.
जंतरमंतरवर माध्यमांसोबत बोलताना जगन मोहन रेड्डी म्हणाले, 'आज ते राज्यात सत्तेत आहेत. कालपर्यंत आम्ही सत्तेत होतो. उद्या आपण पुन्हा सत्तेत येऊ शकतो. पण आम्ही अशा वर्तनाचे कधीच समर्थन केले नाही. आम्ही कधीही हल्ल्यांना आणि मालमत्तेचे नुकसान करण्यास प्रोत्साहन दिले नाही. मात्र टीडीपीचे सरकार आल्यानंतर आंध्र प्रदेशातील परिस्थिती आज पूर्णपणे वेगळी आहे.
माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी म्हणाले की, आंध्र प्रदेशात लोकशाही आहे की नाही. राज्यात नवे सरकार आल्यानंतर ४५ दिवसांत ३० हून अधिक लोकांची हत्या झाली आहे. अनेक मालमत्तांचीही नासधूस झाली आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश राज्यभर लाल किताब प्रदर्शित करत आहे. या लाल किताबात त्या नेत्यांची नावे आहेत ज्यांच्यावर ते कारवाई आणि हल्ले करतील. असे होर्डिंग राज्यभर लावले जातात, असंही माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी म्हणाले.
सत्तेत आल्यानंतर विरोधकांना अशा प्रकारे टार्गेट करू नये, असे अखिलेश यादव म्हणाले. विरोधकांचा आवाजही ऐकायला हवा. लोकशाहीत आलेला बुलडोझरचा ट्रेंड आम्हाला मान्य नाही, असंही अखिलेश यादव म्हणाले. धमक्या देणारे लोक सत्तेत जास्त काळ टिकत नाहीत.