शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

भाजपामध्ये आता बदलांचे वारे; निवडणुकांमुळे मध्य प्रदेश अन् राजस्थानकडे अधिक लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2023 6:51 AM

पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी हे बदल करणे गरजेचे बनले आहे. 

- संजय शर्मानवी दिल्ली : भाजपमध्ये बदलाचे वारे वाहत असले तरी सर्वांच्या नजरा राजस्थान व मध्य प्रदेशकडे लागलेल्या आहेत. या राज्यांतील विधानसभा निवडणुका भाजप कोणाच्या नेतृत्वात लढतो, याची उत्सुकता आहे. कर्नाटकात प्रचंड असंतोष असला तरी भाजपने नेतृत्व बदलास इन्कार केला. त्रिपुरामध्ये विप्लव देव यांच्या जागी माणिक साहा यांच्याकडे सूत्रे दिली. राज्यांत बदल गरजेचे असले तरी याची किंमत चुकवावी लागत आहे. मात्र पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी हे बदल करणे गरजेचे बनले आहे. 

मध्य प्रदेश : चौहान यांना अभय

मध्य प्रदेशात बदल गरजेचा आहे, अशी स्थिती निर्माण झाल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान व प्रदेशाध्यक्ष व्ही.डी.  शर्मा यांना बदलले जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. तथापि, यापूर्वीही अनेकदा अशा चर्चा झालेल्या असल्या तरी चौहान यांच्यावर काहीही परिणाम झालेला नाही. प्रत्येकवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौहान यांना वाचविले आहे. 

त्रिपुरा : सूत्रे साहांकडे 

२०२३ मध्ये सर्वप्रथम त्रिपुरात विधानसभा निवडणुका होतील. तेथे भाजपने काही दिवसांपूर्वीच विप्लव देव यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवून माणिक साहा यांना मुख्यमंत्री केले. अनेक वर्षांपासून डाव्यांचा बालेकिल्ला असलेले हे राज्य भाजपला कोणत्याही स्थिती हातून जाऊ द्यायचे नाही, त्यामुळे त्रिपुरा भाजपसाठी महत्त्वाचे मानले जाते.

कर्नाटक : धुसफूस सुरूच

कर्नाटकमध्ये सत्ताविरोधी लाटेची शक्यता स्पष्ट दिसत असतानाही अखेरच्या वेळी भाजपने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कातील यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका लढण्याचे निश्चित केले. बी. एस. येदीयुरप्पा यांना हटवून भाजपने बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री केले होते. परंतु बोम्मई याच्याबाबतचा असंतोष दाबण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा वापरण्यात येईल व लिंगायत समुदायाचे ज्येष्ठ भाजप नेते येदीयुरप्पा यांना खुश ठेवण्यासाठी त्यांचे पुत्र विजयेंद्र यांना पक्षात चांगले स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. नलीनकुमार कातील यांच्या आरोग्याचे कारण असले तरी ऐनवेळी भाजप ना मुख्यमंत्री बदलणार आहे, ना प्रदेशाध्यक्ष बदलेल.

राजस्थान : एकजूट नाही 

राजस्थानमध्ये भाजप अनेक गटांत विभागलेला दिसत आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, सतीश पुनिया, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हे वेगवेगळ्या गटांचे नेते आहेत. येथे कोणत्याही एका नेत्याच्या नेतृत्वाखाली भाजप एकजूट होत नाही. त्यामुळे राजस्थानमध्ये भाजप विधानसभा निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरच लढेल, असे म्हटले जात आहे.

छत्तीसगड : माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांच्याशिवाय दुसरा मोठा नेता नाही. नेतृत्वात बदल करूनही भाजप पूर्वी जेथे होता तेथेच आहे.

तेलंगणा : भाजप कमजोर आहे. राज्यात जे नेते भाजपमध्ये आलेले आहेत ते काँग्रेस किंवा केसीआर यांच्या पक्षातून आलेले आहेत.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह