आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी प्रथमच संसदेत पोहोचल्या आहेत. वायनाडमधून पोटनिवडणूक जिंकून त्या खासदार झाल्या आहेत.
खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर प्रियांका गांधी यांनी पहिले भाषण केले तेव्हा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या योगदानाचे स्मरण करत त्या म्हणाल्या की, ओएनजीसी, आयआयटी, आयआयएम यासारख्या संस्था भाक्रा नांगल धरण यासारखे प्रकल्प पंडित नेहरू यांनी उभारले.
प्रियांका गांधी सोमवारी एक बॅग घेऊन पोहोचल्या. त्यावर ‘पॅलेस्टाईन’ असे लिहिले होते. त्यांना या बॅगच्या माध्यमातून पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर प्रतीकात्मक निषेध नोंदवायचा होता. संसदेत त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे स्मरण करताना सांगितले की, मी इंदिरा गांधींना नमन करते. ज्यांनी तत्त्वांसाठी लढा दिला आणि बंगाली बांधवांसाठी बांगलादेशची निर्मिती केली. आपला पक्ष आणि कुटुंब यांचा इतिहास सांगून प्रियांका गांधी त्यांच्या योगदानाची आठवण करून देत आहेत.