सध्या देशात मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची वाढ होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. देशातून आणि देशाबाहेरूनही अनेक जण मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. कोरोना विषाणूचा सामना करण्याची लढाई ही विज्ञान आणि सत्यावर आधारित असली पाहजे. तसंच याची पुनरावृत्ती होऊ नये हेदेखील आपण निश्चित केलं पाहिजे. याच मूल्यांच्या आधारावर आपण या महासाथीचा सामना करू शकतो, असं मत विप्रोचे संस्थापक अध्यक्ष अझीम प्रेमजी (Wipro founder chairman Azim Premji) यांनी व्यक्त केलं.
"आपल्याला प्रत्येक पातळीवर तेजीनं प्रयत्न करणं आवश्यक आहे. आपले प्रयत्न हे विज्ञानावर आधारित असले पाहिजेत. तसंच या महासाथीचा सामना करण्यासाठी त्याचा विस्तार आणि प्रादुर्भावाच्या स्तरावर काम करावं लागेल," असंही अझीम प्रेमजी यांनी स्पष्ट केलं. एएनआयनं यासदंर्भातील वृत्त दिलं आहे. "अशा परिस्थितीत आपल्याला एक राष्ट्र म्हणून एकत्र राहावं लागेल. आपल्याला मतभेद विसरून एकत्र यावं लागेल. यातच शक्ती आहे आणि जर याचा आपण वेगवेगळं राहून सामना केला तर आपल्याला संघर्ष करावा लागेल," असंही त्यांनी नमूद केलं.सर्वात कमकूवत बाबीपर्यंत आपल्याला लक्ष केंद्रीत करायला हवं. याशिवाय कोरोना महासाथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थिती दु:खद झाली आहे. परंतु तुम्ही गावांकडे पाहा. जे गरीबीत जीवन जगत आहेत त्यांच्याकडे पाहा. सर्वकाही संपलं आहे. हे केवळ या महासाथीमुळे झालं नाही. तर अर्थव्यस्थेवर झालेल्या परिणामुळेही झालं आहे," असं त्यांनी नमूद केलं.