Narendra Modi : फक्त 5 वर्षांत देशातील 13.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 05:19 PM2023-10-12T17:19:38+5:302023-10-12T17:35:09+5:30
PM Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी पिथौरागडमध्ये जवळपास 4200 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिथौरागडमध्ये जवळपास 4200 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं आहे. "मला विश्वास आहे की हे दशक उत्तराखंडचे असेल. उत्तराखंड विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल आणि तुमचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी आमचे सरकार पूर्ण प्रामाणिकपणे काम करत आहे. आम्हाला डोंगरावर राहणाऱ्या लोकांचीही काळजी होती, त्यामुळेच फक्त 5 वर्षांत देशातील 13.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. भारत आपली गरिबी हटवू शकतो याचं हे उदाहरण आहे" असं मोदींनी म्हटलं आहे.
"वन रँक-वन पेन्शनची त्यांची अनेक दशकं असलेली जुनी मागणी आमच्या सरकारने पूर्ण केली आहे. आतापर्यंत, आमच्या सरकारने माजी सैनिकांना वन रँक-वन पेन्शन अंतर्गत 70 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिली आहे. उत्तराखंडमधील माजी सैनिकांच्या 75 हजारांहून अधिक कुटुंबांनाही याचा लाभ झाला आहे" असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
#WATCH | Uttarakhand: Prime Minister Narendra Modi says, "We have worked for those living in far-flung areas & therefore within five years 13.5 crore people have been uplifted out of poverty...These 13.5 crore people are an example that India can eradicate poverty. Earlier… pic.twitter.com/6Ljb60J8v4
— ANI (@ANI) October 12, 2023
"आमचे सरकार माता-भगिनींच्या प्रत्येक अडचणी दूर करण्यासाठी कटिबद्ध आहे. यावर्षी लाल किल्ल्यावरून मी महिला बचत गटांना ड्रोन देण्याची घोषणा केली आहे. ड्रोनद्वारे औषधे, खते आणि बियाणे शेतात पोहोचवता येतात. पर्वतांमध्ये ड्रोनद्वारे औषधांची डिलिव्हरीही जलद होईल."
"आज जगाला खेळातही भारताची ताकद दिसत आहे. नुकत्याच आशियाई क्रीडा स्पर्धा संपल्या. यामध्ये भारताने इतिहासातील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. भारतीय खेळाडूंनी प्रथमच 100 हून अधिक पदकं जिंकण्याचा विक्रम केला आहे. जिथे आपलं चंद्रयान पोहोचलं आहे, तिथे दुसरं कोणतंही चंद्रयान पोहोचू शकलं नाही आणि त्या जागेला आम्ही शिवशक्ती असं नाव दिलं" असं मोदींनी म्हटलं आहे.