शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

‘ते’ निकाल घटनेच्या चौकटीतच, चंद्रचूड स्पष्टच बोलले; अयोध्या, कलम ३७० प्रकरणावर प्रथमच खुलेपणाने मांडली मते

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 6:53 AM

अयोध्या खटल्याचा निकाल देणाऱ्या पाच न्यायमूर्तींनी निर्णयात कोणत्याही न्यायमूर्तींचे नाव दिले जाणार नाही, असा निर्णय सर्वानुमते घेतला होता, असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले.

नवी दिल्ली : ‘अयोध्या प्रकरण, कलम ३७० यावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या चौकटीतच दिला,’ असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सोमवारी एका मुलाखतीत स्पष्ट केले. 

अयोध्या खटल्याचा निकाल देणाऱ्या पाच न्यायमूर्तींनी निर्णयात कोणत्याही न्यायमूर्तींचे नाव दिले जाणार नाही, असा निर्णय सर्वानुमते घेतला होता, असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले. ‘या खटल्याला विविध  दृष्टिकोनांचा, संघर्षाचा दीर्घ इतिहास आहे व खंडपीठाचा भाग असलेल्या सर्वांनी ठरवले की, हा न्यायालयाचा निर्णय असेल. अंतिम निकालातच नव्हे तर निकालातील कारणांमध्येही आम्ही एकत्र आहोत, असा स्पष्ट संदेश देणे ही त्यामागची कल्पना होती,’ असे  चंद्रचूड म्हणाले.

समलिंगी विवाह निकालाबद्दल...सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मंजुरी देण्याबाबतची याचिका फेटाळल्याबद्दल चंद्रचूड यांनी सांगितले की, एखाद्या खटल्याचा निकाल हा न्यायाधीशांसाठी कधीही वैयक्तिक नसतो आणि त्याला त्याचा कोणताही पश्चात्ताप नसतो. आता या खटल्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे तो विषय संपला आहे.

कलम ३७०च्या निकालावरील टीकेबद्दलसरन्यायाधीशांनी घटनेतील कलम ३७० रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या निर्णयावर झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यास नकार दिला. ‘न्यायाधीश संविधान आणि कायद्याच्या चौकटीत एखाद्या खटल्याचा निर्णय घेतात,’ असे ते म्हणाले. 

कॉलेजियम व्यवस्थेबद्दल...उच्च न्यायव्यवस्थेत न्यायाधीशांची नियुक्ती करणाऱ्या न्यायमूर्तींच्या कॉलेजियम प्रणालीत अधिक पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. कॉलेजियम प्रणालीमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRam Mandirराम मंदिरDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडArticle 370कलम 370