नवी दिल्ली : देशातील इंजिनाशिवाय धावणारी पहिली ट्रेन 18 चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 29 डिसेंबरला करण्यात येणार आहे. ही ट्रेन चाचणीसाठी सफदरजंग स्टेशन ते आग्राच्या केंट स्टेशनपर्यंत चालविण्यात आली. या चाचणीवेळी ट्रेनचा वेग 180 किमी प्रतितास होता. तसेच ही अंतिम चाचणी यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला. मात्र, यावेळी ट्रेनच्या काचा फुटल्याचे आढळून आले आहे.
रविवारी दुपारी 12.15 मिनिटांनी ट्रेन 18 ची अंतिम चाचणी घेण्यात आली. यावेळी ही ट्रेन दिल्लीहून आग्राला जात असताना काही समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत खिडक्यांच्या काचा फुटल्या.
इंटीग्रल कोच फॅक्टरीच्या व्यवस्थापकांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहेस की ट्रेन 18 ने 180 किमी प्रतितास एवढा वेग पकडला होता. रेल्वेच्या माहितीनुसार ही ट्रेन 181 किमीचा वेग पकडते.
दिल्लीला मोठ्या काचा असलेल्या मेट्रोची जवळपास 10 वर्षांपासूनची सवय आहे. मात्र, काही समाजकंटकांनी नव्या ट्रेनवर दगडफेक केल्याने रेल्वेच्या चिंता वाढल्या आहेत.