शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

धोनीची वैयक्तिक माहिती जाहीर केल्याने साक्षी संतापली

By admin | Published: March 29, 2017 9:29 AM

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची वैयक्तिक माहिती लीक झाल्याने पत्नी साक्षीने संताप व्यक्त केला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची वैयक्तिक माहिती लीक झाल्याने पत्नी साक्षीने संताप व्यक्त केला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. आधार कार्डच्या प्रमोशनादरम्यान अपघाताने एजन्सीकडून धोनीची वैयक्तिक माहिती जाहीर करण्यात आल्याने  साक्षीने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला धारेवर धरत संताप व्यक्त केला. यानंतर साक्षीने सरळ  माहिती आणि प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद यांना ट्विट करत प्रश्न विचारले. 
 
महेंद्रसिंग धोनीच्या घरी जाऊन अधिका-यांनी आधार कार्डची प्रक्रिया पुर्ण केली होती. यावेळी धोनीसोबत फोटो काढण्यात आला होता, जो एनज्सीने ट्विट केला होता. या ट्विटमध्ये रवीशंकर प्रसाद यांनाही टॅग करण्यात आलं होतं. या ट्विटमध्ये धोनीच्या फोटोसोबत त्याची वैयक्तिक माहिती देणा-या फॉर्मची कॉपीही टाकण्यात आली होती. यानंतर साक्षीने संताप व्यक्त करत ट्विटरच्या माध्यमातून प्रायव्हसी नावाचा काही प्रकार आहे का ?, असा सवाल रवीशंकर प्रसाद यांना केला.
 
साक्षीच्या ट्विटला रवीशंकर प्रसाद यांनीही तातडीने उत्तर दिलं. मात्र रवीशंकर प्रसाद यांना सुरुवातील काय झालं होतं कळलं नाही. त्यांनी साक्षीला काही ट्विटमधून काही वैयक्तिक माहिती लीक झाली का ? अशी विचारणा केली. यानंतर साक्षीने उत्तर देत आधार कार्ड फॉर्ममध्ये वैयक्तीक माहिती भरलेली आहे. तो फॉर्म अपलोड करण्यात आलाय, असं ट्विट करुन उत्तर दिलं.
 
 
यानंतर रवीशंकर प्रसाद यांनी याची तातडीने दखल घेत ट्वीट हटवण्यास सांगितलं. शिवाय हा प्रकार करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनही दिलं.