Dog Attack: दिल्लीत भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत आहे. शहरातील अनेक भागात कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. आता ताजे प्रकरण दिल्लीतील विश्वास नगरमध्ये घडले. एका महिलेवर कुत्र्यांनी हल्ला करुन तिच्या हातात असलेले बाळ हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजूबाजूच्या लोकांनी महिला आणि तिच्या मुलाला वाचवले.
महिला आपल्या लहान मुलाला घेऊन कुठेतरी जात होती. यावेळी कुत्र्याने अचानक तिच्यावर हल्ला केला. महिलेने मोठी हिंमत दाखवून मुलाला वाचवले. यावेळी काही लोक तिच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी एका कुत्र्याला मागे ढकलले. यानंतर दुसऱ्या कुत्र्याने पुन्हा तिच्यावरच हल्ला केला. मात्र, लोकांनी महिला आणि मुलाला कसेबसे वाचवले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत आहे. गेल्या वर्षभरात दिल्लीत कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यातील अनेक घटनांमध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ऑगस्ट 2023 मध्ये वसंत कुंजमध्ये भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला होता.