चेन्नई – तामिळनाडूतील चेन्नईत एका सरकारी हॉस्पिटलमध्ये ८ महिन्याच्या गर्भवती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेने गर्भपात करण्यासाठी गोळ्या खाल्ल्या त्यामुळे तिचा मृत्यू झाला. मूळची ओडिशामधील रहिवाशी असलेली कुमारी कंजाका ही तिचा पती प्रताप उलाका आणि भाची गीता कंजाकासोबत चेन्नईमध्ये राहण्यास आहे.
प्रसुती वेदनेमुळं महिला होती त्रस्त
पोलिसांनी सांगितले की, महिला काही दिवसांपूर्वी भाची गीतासोबत तिच्या कुठल्याही नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारात गेली होती. ओडिशाहून परतल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं परंतु प्रसुतीबाबतच्या त्रासामुळे तिचा मृत्यू झाला. ओडिशाहून परतल्यापासून महिला खूप चिंतेत होती आणि तिला प्रसुतीच्या वेदना खूप जाणवू लागल्या होत्या.
औषधामुळे गर्भात झालं संक्रमण
टाइम्स ऑफ इंडिया रिपोर्टनुसार, २० सप्टेंबरला चेन्नई पोहचल्यानंतर महिला बाथरूममध्ये घसरली होती. त्यानंतर काही दिवसांनी तिच्या पोटात दुखू लागल्याची तक्रार करत होती. यावेळी कुटुंबाने महिलेला किलपौक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल केले होते. डॉक्टरांनी जेव्हा महिलेची तपासणी केली तेव्हा तिच्या गर्भात संक्रमण झाल्याचं आढळलं. त्यानंतर डॉक्टरांनी गर्भाशय काढण्याचा निर्णय घेतला. तेव्हा या महिलेची सर्जरी करण्यात आली. परंतु त्यानंतरही महिलेच्या तब्येतीत काहीच सुधारणा झाली नाही. अखेर या महिलेचा मृत्यू झाला.
पोस्टमोर्टममध्ये झाला खुलासा
महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम करण्यात आले. त्यानंतर मृत महिलेच्या नातेवाईकांची चौकशी केली असता वेगळंच सत्य बाहेर आलं. या महिलेने गर्भ खाली करण्यासाठी गोळ्या घेतल्या होत्या. डॉक्टरांनी सांगितले की, कुमारी कंजाकानं कुटुंबातील सदस्यांना सांगितले की तिने गर्भ खाली करण्यासाठी गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या आहेत. गर्भपाताचं औषध घेणं आणि तेदेखील सातव्या महिन्यात हे महिलेच्या प्रकृतीसाठी धोकादायक असू शकतं. गर्भ खाली झाल्यानंतर गर्भाशयाची अवस्था नाजूक असते त्यात गोळ्यांचे सेवन आणखी अवस्था बिघडवू शकते. त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पोलीस या प्रकरणात आणखी तपास करत आहे. त्याचसोबत कुटुंबातील सदस्यांनी महिलेला गर्भपाताची गोळी खाण्यास भाग पाडलं का? यादृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.