Vande Bharat Express : वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी अनेकजण आतुरतेने वाट पाहतायत. बाह्य किंवा आंतरिक सौंदर्यासोबत वंदे भारत ट्रेन वेग आणि निसर्गरम्य दृश्यांपेक्षा बरेच काही अनुभवत देते.त्यामुळे अनेकजण आपल्या प्रवासाबद्दलही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. मात्र वंदे भारतबद्दल एका तरुणीने तिला आलेला वाईट अनुभव शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरु झालीय.
देशातील सर्वात लोकप्रिय ट्रेन वंदे भारतबाबत लोक खूप उत्सुक आहेत. मंत्र्यांपासून, अभिनेते आणि ब्लॉगर्सपर्यंत सर्वांनी वंदे भारतने प्रवास करण्याबाबत आपापली मते मांडली आहेत. मात्र आता एका तरुणीने या ट्रेनबद्दलचा तिचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. वंदे भारत संदर्भात महिलेने सोशल मीडियावर केलेली टिप्पणी सध्या व्हायरल झाली आहे.
कोलकातमधल्या एका तरुणीने वंदे भारतमधील तिच्या पहिल्या प्रवासाबद्दल आणि जवळजवळ प्रत्येक गोष्टीबद्दल नकारात्मक बाबी शेअर केल्या आहेत. @epicnephrin_e या नावाने युजरच्या मते वंदे भारतच्या खिडक्या सूर्यप्रकाश रोखण्यासाठी पुरेशा प्रभावी नाहीत. तरुणीने सांगितले की, संपूर्ण प्रवासादरम्यान तिला तिच्या डेनिम जॅकेटने तिचा चेहरा झाकावा लागला होता.
तरुणीने वंदे भारत ट्रेनमधील जेवण देखील सामान्य असल्याचे म्हटलं. जेवणाबद्दल बोलताना तरुणीने म्हटलं की वंदे भारतमधील जेवण हे शताब्दीमधील गाड्यांमधील सरासरी भाड्याइतके आहे. मात्र, दुपारचे जेवण समाधानकारक असल्याचे तरुणीने सांगितले. स्वयंचलित दरवाजे आणि स्वच्छ स्वच्छतागृहांमुळे तरुणी प्रभावित झाली. ट्रेनमधील सर्व सूचनांसाठी तरुणीने ब्रेल लिपीतील भाषांतराचे कौतुक देखील केले. तरुणीने ट्रेनमधील तिचा संपूर्ण अनुभव फोटोंच्या माध्यमातून शेअर केला.
तरुणीच्या वंदे भारतच्या पोस्टला १.५ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. दुसरीकडे या पोस्टवर नेटकऱ्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने वंदे भारतमध्ये सर्वात खराब ओव्हरहेड सामानाचे शेल्फ आहेत, असं म्हटलं आहे. ते शेल्फ खूपच अरुंद आहेत आणि बॅग बाहेर पडू नयेत यासाठीच पुरेसे आहेत, असं म्हटलं आहे. आणखी एका युजरने, "होय मलाही याच समस्येचा सामना करावा लागला,जेवण देखील पूर्णपणे दयनीय आहे," असं म्हटलं आहे. "ट्रेनचा वेग वाढल्यावर एसी नीट काम करत नाही. ओव्हरहेड सामानाच्या जागेमुळे खिडकीच्या सीटला थंड हवा मिळत नाही. लोकांसाठीही मधल्या जागा अत्यंत अस्वस्थ असतात, असेही एका युजरने सांगितले.