कोलकाता : प. बंगालमधील सरकारी रुग्णालयात प्रसूतीनंतर एका महिलेला डॉक्टरांनी मुदत संपलेली औषधे दिल्याने तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी १२ डॉक्टरांना निलंबित करण्यात आले, तसेच त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मिदनापूर मेडिकल महाविद्यालयाच्या रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांवरील गुन्हा शाबित झाल्यास त्यांना १० वर्षांचा कारावास व दंड अशी शिक्षा होऊ शकते. या डॉक्टरांना निलंबित करण्यात आले. मुदत संपलेली औषधे आणखी चार महिला रुग्णांना देण्यात आली होती. त्यातील तीन जणींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वृत्तसंस्था)