अपघातात झालं पतीचं निधन, आत्महत्या करण्यासाठी जहांगीर महालावर पोहोचली पत्नी आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 11:59 AM2022-05-21T11:59:37+5:302022-05-21T12:01:42+5:30

Madhya Pradesh : असं सांगितलं गेलं की, नीलमच्या पतीचा या आठवड्यात मउरानीपूर हायवेवर अपघात झाला होता, उपचारा दरम्यान त्याचं निधन झालं. 

Woman distressed by husbands death climbs on Jahangir Mahal to commit suicide Niwari Madhya Pradesh | अपघातात झालं पतीचं निधन, आत्महत्या करण्यासाठी जहांगीर महालावर पोहोचली पत्नी आणि मग...

अपघातात झालं पतीचं निधन, आत्महत्या करण्यासाठी जहांगीर महालावर पोहोचली पत्नी आणि मग...

Next

Madhya Pradesh : मध्य प्रदेशच्या निवाडीमध्ये पतीच्या मृत्यूचा पत्नीला असा काही धक्का बसला की, ती आत्महत्या करण्यासाठी ओरढा येथील जहांगीर महालात पोहोचली. मात्र, पोलिस, पुरातत्व विभाग, प्रशासन आणि परिवाराच्या लोकांनी महिलेला वाचवलं. महिलेचं नाव नीलम अहिरवार आहे. असं सांगितलं गेलं की, नीलमच्या पतीचा या आठवड्यात मउरानीपूर हायवेवर अपघात झाला होता, उपचारा दरम्यान त्याचं निधन झालं. 

पतीच्या मृत्यूचा पत्न नीलमला असा काही धक्का बसला की, आधी तिने ओरछातील बेतवा नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण तिथे बरेच लोक होते त्यामुळे महिला आत्महत्या करण्यासाठी जहांगीर महालात गेली. आत्महत्या करण्यासाठी जशी वर चढली लोकांनी तिला पाहिलं आणि पोलिसांना सूचना दिली.

तीन तासांच्या मोठ्या मेहनतीनंतर नीलमला सुरक्षित महालातून खाली उतरवण्यात आलं. महिलेचं रेस्क्यू ऑपरेशन फारच कठीण होतं कारण एकीकडे संसाधनांची कमतरता होती आणि महिला जीव देण्यावर अडून बसली होती. रेस्क्यू टीमच्या जवानांना तिच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण भीती होती की, कुणाला येताना पाहून महिला खाली उडी मारेल.

यादरम्यान नीलमच्या परिवाराला सूचना देण्यात आली. त्यानंतर तिचे वडील आणि तिच्या मृत पतीचे मित्र तिथे पोहोचले. त्यांच्या समजावण्याचाही काही फरक पडला नाही. दुसरीकडे प्रशासन, पोलीस तिला वाचण्यासाठी प्रयत्न करतच होते. डॉक्टरांची टीमही बोलवण्यात आली.

महिलेला सर्वांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती काहीच ऐकायला तयार नव्हती. महिलेने तिचे सगळे दागिने खाली फेकणं सुरू केले. महालाच्या ज्या ठिकाणी नीलम बसली होती तिथे जाण्याचा काही खास रस्ता नव्हता. नीलम तिथे उडी मारून पोहोचली होती. त्यामुळे तिच्या हात, पाय आणि कंबरेवर गंभीर जखमा झाल्या होत्या.

सगळे नीलमला समजावत होते की, तिने असं पाउल उचलू नये. तेव्हाच नीलमची लहान बहीण तिथे आली. तिने खूप समजावल्यावर नीलमने तिचं ऐकलं. त्यानंतर पोलीस तिला सुरक्षित खाली घेऊन आला. या संपूर्ण रेस्क्यूला ३ तास लागले. तोपर्यंत तिथे उपस्थित सर्व लोकांचा श्वास रोखला गेला होता. सुदैवाने महिला सुरक्षित आहे.

निवाडीच्या नीलमने मउरानीपूरच्या अमित अहिरवारसोबत गेल्यावर्षी लव्ह मॅरेज केलं होतं. अमित मउरानीपूरमधील फार चांगला फोटोग्राफर होता. त्यांच्या लग्नाला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं होतं. ४ दिवसाआधी अपघातात अमित गंभीर जखमी झाला होता आणि हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचं निधन झालं होतं. त्यानंतर महिला झांसीहून ओरछाला आली आणि इथे जहांगीर महालावर आत्महत्या करण्यासाठी पोहोचली.
 

Web Title: Woman distressed by husbands death climbs on Jahangir Mahal to commit suicide Niwari Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.