शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद, निवृत्त महिला पोलीस निरीक्षकाकडून 1.10 कोटी रुपयांचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 9:39 AM

पुष्पा दुबे यांनी पीएम केअर्स फंडात एक कोटी आणि उत्तर प्रदेश सीएम रिलीफ फंडात दहा लाख रुपयांची मदत केली आहे.

ठळक मुद्देपीएम केअर्स फंडाबाबत वाद वाढत आहे. त्यामुळे पीएम केअर्स फंडाचे ऑडिट केले जाणार आहे.

लखनऊ : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या तीन लाखाहून अधिक झाली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने एकत्र काम करत आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी लोकांना पीएम केअर्स फंडात मदत करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत ७० वर्षीय निवृत्त महिला पोलीस निरीक्षक पुष्पा दुबे यांनी आपली सर्व कमाई पीएम केअर्स फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली आहे.

पुष्पा दुबे यांनी पीएम केअर्स फंडात एक कोटी आणि उत्तर प्रदेश सीएम रिलीफ फंडात दहा लाख रुपयांची मदत केली आहे. जवळपास दहा वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश पोलीस सेवेतून निरीक्षक म्हणून निवृत्त झालेल्या पुष्पा दुबे यांनी आपल्या एलआयसीची पॉलिसी आणि मुदत ठेवी (फिक्स्ड डिपॉझिट) फोडून ही रक्कम जमा केली आहे. शनिवारी पुष्पा दुबे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आणि हा निधी त्यांच्याकडे सोपविला.

जागतिक माहामारीचा सामना करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनामुळे मदत करण्यासाठी प्रेरित झाले, असे लखनऊमधील इंदिरा नगर येथे राहणाऱ्या पुष्पा दुबे यांनी सांगितले. त्यांची शेवटची पोस्टिंग सचिवालय व सीआयडी मुख्यालयात झाली होती. तसेच, त्यांनी कुटुंबीयांविषयी फारशी माहिती न देता आपल्या घरात राहत असून सध्या मिळणारे पेन्शन हे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसे असल्याचे त्यांनी सांगितले. इटावा आणि पीलीभीत याठिकाणी पुष्पा दुबे यांनी आपले एमएससीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पोलीस सेवेत नोकरी करण्याचे ठरविले होते.

पीएम केअर्स फंडाचे ऑडिट होणार...पीएम केअर्स फंडाबाबत वाद वाढत आहे. त्यामुळे पीएम केअर्स फंडाचे ऑडिट केले जाणार आहे. वाद आणि कोर्टाच्या खटल्यांना सामोरे जात मोदी सरकारने शुक्रवारी पीएम केअर्स फंडाचे ऑडिट माहिती अपडेट करण्यासाठी स्वतंत्र ऑडिटरची (लेखापरीक्षक) नियुक्ती केली आहे. तसेच, पंतप्रधान कार्यालयाचे दोन अधिकारी मानद आधारावर या फंडाचे काम पाहणार आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी