बीरभूम/कोलकाता - कोरोनाच्या संकटात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात घडली आहे. एका आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची लज्जास्पद घटना घडली. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. महिलेवर अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता आणि पंचायतीने तिला एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र एवढा दंड भरणं महिलेला शक्य झालं नाही. दंड न भरल्याने पंचांनी महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीरभूम जिल्ह्यातील मोहम्मद बाजार परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. आदिवासी महिलेवर एका तरुणासोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर गावातील पंचांनी यासाठी पंचायतीची बैठक बोलावली. त्यात महिला आणि तरुणाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. 50 हजार रुपयांचा दंड भरल्यानंतर तरुणाची सुटका करण्यात आली. तर महिलेला फक्त 10 हजार रुपये देणं शक्य झालं. दंडाची संपूर्ण रक्कम न भरल्याने तिला जबरदस्तीने जंगलात नेण्यात आले आणि तिथे तिच्यावर सात जणांनी सामूहिक बलात्कार केला.
भोलाबंध गावात घडलेल्या या घटनेतील पीडित महिलेने गावच्या प्रमुखासह सात जणांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी चौघांना पोलिसांनीअटक केली आहे. तर अन्य तिघांचा शोध घेण्यात येत आहे. महिलेची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पंचायतीची बैठक बोलावल्यानंतर स्थानिकांनी दोन तरूण आणि महिलेला बेदम मारहाण केली होती. आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
विकृतीचा कळस! 16 वर्षीय मुलीवर 30 जणांनी केला बलात्कार
काही दिवसांपूर्वी इस्रायलच्या इलट शहरातही अशीच एक धक्कादायक घटना घडली होती. सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले. एका हॉटेलमध्ये 16 वर्षीय मुलीवर 30 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची भयंकर घटना समोर आली होती. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी 'मानवतेविरोधातील गुन्हा' अशी प्रतिक्रिया दिली. तसेच पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक केली. धक्कादायक म्हणजे आरोपींनी मुलीचे आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केल्याची माहिती समोर आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
काय सांगता? जगातील सर्वात स्वस्त मोबाईल डेटा भारतात; तर 'या' देशात आहे सर्वात महाग
मेड इन चायनाचा 'या' देशाला बसला मोठा फटका; 3700 निरोगी लोकांना दाखवलं 'कोरोना पॉझिटिव्ह'
CoronaVirus News : देशात कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यामागे 'हे' आहे कारण, ICMR ने दिला गंभीर इशारा
Mahad Building Collapse: 'इमारत असो वा समाज, पाया हा मजबूतच हवाच'; सुबोध भावेचं सूचक ट्विट