रायपूर - देशात कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत देशात एकूण 1637 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर मृतांचा आकडा ३८ वर पोहोलचा आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशाल लॉकडाऊनही करण्यात आहे. अशा परिस्थितीत छत्तीसडच्या रायपूरमध्ये एक महिले जुळ्यांना जन्म दिला. विशेष म्हणजे, कुटुंबीयांनी त्यांची नावे "कोविड आणि कोरोना," अशी ठेवली आहेत.
यामुळे ठेवले कोविड आणि कोरोना नाव -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात भीतीचे वातावरण आहे. सरकारने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. याच दरम्यान 27 मार्चला अंबेडकर रुग्णालयात एका महिलेने जुळ्यांना जन्म दिला. त्यामुळे लोकांच्या मनातील या महामारीची भीती दूर करण्यासाठी या महिलेने आणि तिच्या कुटुंबीयांनी या मुलांची नावेच कोवीड आणि कोरोना, अशी ठेवली आहेत.
घारातील आनंदाला पारावार नाही -
'पुरानी बस्ती' येथील विनय वर्मा यांच्या घरात सध्या दुहेरी आनंदाचे वातावरण आहे. कारम त्यांच्या घरात जुळ्यांचा जन्म झाला आहे. यावेळी या मुलांची आई प्रीती वर्मा म्हणाल्या, संपूर्ण देश कोरोनाशी लढत आहे. भारतातील संपूर्ण प्रवासी ट्रेन बंद असण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रत्येक व्यकिती ज्याच्या त्याच्या घरात आहे. असे असतानाच मला 27 मार्चला जुळी मुले झाली. वर्मा कुटुंबीयांनी या जुळ्यांतील मुलीचे नाव कोरोना तर मुलाचे नाव कोविड ठेवले आहे.
आयुष्यभर विसरणार नाही -
प्रीती म्हणतात, की मी हा दिवस कधीच विसरू शकत नाही. माझ्या पोटात शुक्रवारी सायंकाळ पासूनच दुखायला लागले होते. अशात अंबेडकर रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागली.
दुचाकीवरून न्यावेलागले रुग्णालयात -
लॉकडाऊन असल्याने रुग्णालयात जाण्यासाठी काहीही साधन मिळाले नाही. त्यामुळे आम्हाला दुचाकीवरूनच रुग्णालयात यावे लागले. यावेळी अनेक ठिकाणी आमची तपासणीही झाली. प्रीती म्हणतात, की हा त्रास आणि लोकांमध्ये असलेली कोरोनाची भीती, यामुळेच आम्ही मुलांची नावे कोरोना आणि केविड अशी ठेवली आहे. मंगळवारी दुपारपर्यंत हे जुळे आणि त्यांची आई रुग्णालयात होते. या मुलांना रुग्णालयात पाहण्यासाठी येणारे लोकही मुलांची, अशी नावे ठेवणे हा धाडसी निर्णय असल्याचे म्हणत आहेत.