काय सांगता? महिलेने दिला तब्बल सहा बाळांना जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 12:36 PM2020-03-01T12:36:44+5:302020-03-01T12:43:08+5:30
एका 22 वर्षीय महिलेने तब्बल सहा बाळांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे.
श्योपूर - जुळी मुलं जन्माला आल्याच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. मात्र एका 22 वर्षीय महिलेने तब्बल सहा बाळांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या श्योपूरमध्ये ही घटना घडली. मात्र जन्मानंतर काही वेळाने सहा बाळांपैकी 5 बाळांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. सध्या रुग्णालयात बाळावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या श्योपूरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने 35 मिनिटांत सहा बाळांना जन्म दिला. मूर्ती सुमन असं 22 वर्षीय महिलेचं नाव असून प्रसूतीच्या कळा येऊ लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर सहा बाळांचा जन्म झाला. मात्र सर्वच बाळांचे वजन हे कमी होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच पाच बाळांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या बाळांमध्ये चार मुलं आणि 2 मुली होत्या. सर्व बाळांचं वजन अत्यंत कमी होतं. एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच मूर्ती सुमन यांची प्रकृतची ठीक आहे.
काही महिन्यांपूर्वी टेक्सासमधील ह्यूस्टनमध्ये एका महिलेने एकाचवेळी सहा बाळांना जन्म दिल्याची आश्चर्यकारक घटना घडली होती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील 'द वुमेन्स हॉस्पिटल ऑफ टेक्सास' मध्ये एका महिलेने सहा बाळांना जन्म दिला होता. 'थेलमा चैका असं या महिलेचं नाव असून त्यांनी 15 मार्च रोजी सहा बाळांना जन्म दिला. यामध्ये चार मुलं आणि दोन मुलींचा समावेश आहे. या सहा बाळांची प्रकृती उत्तम असून थेलमा याची प्रकृती देखील उत्तम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. जगभरात 4.7 अब्ज महिलांमध्ये अशी एखादीच महिला असते जी एकाचवेळी 6 मुलांना जन्म देते अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CAA : हिंदू सेनेच्या इशाऱ्यानंतर शाहीन बागमध्ये जमावबंदीचा आदेश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्नी रश्मी यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी
China Coronavirus : 'कोरोना'चा कहर! जगातील 500 श्रीमंत व्यक्तींचे 444 अब्ज डॉलरचे नुकसान
संतापजनक! मुलाशी फोनवर बोलते म्हणून कुटुंबियांची भरचौकात मुलीला मारहाण, दिली भयंकर शिक्षा
"अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यासाठी घटना सार्वजनिक दृष्टिपथात होणे आवश्यक"