Prajwal Revanna Case : कर्नाटकात सध्या माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातवाचे अश्लिल व्हिडीओ प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. हसन लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि जेडीएसचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांच्या अश्लील व्हिडिओप्रकरणी राज्य महिला आयोगाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहील होतं. त्यानंतर कर्नाटक सरकारने चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन केलं आहे. रेवन्ना यांच्या मतदारसंघात निवडणूक होण्याच्या आदल्याच दिवशी हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता रेवन्ना यांच्या घरी काम करणाऱ्या एका महिलेने त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवत आपली आपबिती सांगितली आहे.
रेवन्ना यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेने फिर्याद दिल्यानंतर प्रज्वल रेवन्ना आणि त्यांचे वडील एचडी रेवन्ना यांच्या विरोधात एफआयआर दाखल केलायह. फिर्यादीमध्ये लैंगिक छळाचे आरोप करण्यात आले होते. प्रज्वल रेवन्ना यांच्या विरोधात तक्रार दाखल करणाऱ्या महिलेने दावा केला की, नोकरी सुरू केल्यानंतर चार महिन्यांनीच प्रज्वल हे तिला वारंवार आपल्या खोलीत बोलावून घेत. महिलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण आता आणखी तापण्याची शक्यता असून निवडणुकीत याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे.
तक्रारदार महिलेने पोलिसांना सांगितले की, तिने इतर पीडितांच्या अग्नीपरीक्षेचे वर्णन करणारे व्हिडिओ पाहिले आहेत.त्यामुळे मी पुढे येऊन पिता-पुत्राच्या विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला.पीडितेने आरोप केला की, काम सुरू केल्यानंतर चार महिन्यानंतर रेवन्ना तिचा लैंगिक छळ करू लागले. प्रज्वल माझ्या मुलीला देखील व्हिडिओ कॉल करत असे आणि अश्लील संभाषण करायचे. माझ्या तसेच कुटुंबातील इतर सदस्यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोपही महिलेने केला आहे.
"प्रज्वल रेवन्ना मला त्यांच्या क्वार्टरवर बोलवायचे. त्या घरात सहा महिला काम करत होत्या.जेव्हा पण प्रज्वल रेवन्ना घरी यायचे तेव्हा आम्हाला भीती वाटायची. एवढंच नाही तिथे काम करणारे पुरुष सहकारी देखील त्यांच्यापासून सावध राहायला सांगायचे. एचडी रेवन्ना आणि प्रज्वल यांनी त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलांचा अतोनात लैगिक छळ केला.एचडी रेवन्ना हे त्यांची पत्नी घरी महिलांना स्टोअर रूममध्ये बोलावत असे. त्यांना फळे देताना ते महिलांना स्पर्श करायचे. ते त्यांच्या साड्यांच्या पिन काढायचे आणि नंतर महिलांचा लैंगिक छळ करायचे," असा दावा तक्रारदार महिलेने केला आहे.
तक्रारीनुसार, महिलेने दावा केला की 'प्रज्वल्ल रेवन्ना माझ्या मुलीला देखील व्हिडीओ कॉल करायचे आणि गैरवर्तुनक करायचे. ते सारखे माध्या मुलीला व्हिडीओ कॉल करायचे. त्यामुळे कंटाळून माझ्या मुलीने त्यांना ब्लॉक केले.'
दरम्यान, याप्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिताच्या विविध संबंधित कलमांतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकजे प्रज्वल रेवन्नांनी देश सोडल्याची माहिती देखील पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे रेवन्ना तात्काळ अटक करण्याची मागणी काँग्रेसकडून केली जात आहे.