नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात चार दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. आज पहाटे ५.३० वाजता चारही दोषींना तिहार तुरूंगात फाशी देण्यात आली. फाशी देण्याच्या याचिकेवर सुनावणी रात्री उशीरा सर्वोच्च न्यायालयात पार पडली. निर्भया सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर राष्ट्रपती भवनाबाहेर संतप्त नागरिकांनी तीव्र निदर्शने केली होती.
Nirbhaya Case: बलात्कारातील अल्पवयीन आरोपी ज्याचा चेहराही कोणी पाहिला नाही; तो सध्या ‘असं’ जीवन जगतोय
Nirbhaya Case : अखेर न्याय जिंकला! नराधमांना फाशी दिल्यानंतर मोदींनी दिली प्रतिक्रिया
Nirbhaya Case: 'त्या' चौघांना एकत्र फासावर लटकवून जल्लाद पवनने मोडला पणजोबांचा रेकॉर्ड
या निदर्शनात वकील सीमा कुशवाहा यांचा एक भाग म्हणून सामील झाली होती. सीमा म्हणते की, निषेधाच्या वेळीच निर्भयाच्या दोषींना फासावर लटकावणार असल्याचा तिने निश्चय केला होता. त्यानंतर ती २०१४ मध्ये या प्रकरणात सामील झाली. वकील सीमा कुशवाहा यांचे हे पहिलेच प्रकरण होते आणि या प्रकरणात तिने सात वर्ष निर्भयाच्या न्यायासाठी लढा दिला. सीमाने निर्भयाचे हे संपूर्ण प्रकरण विनामूल्य कोर्टात लढले आहे. जाणून घेऊया कोण आहे सीमा कुशवाहा... तिच्यासाठी हे वकिलीचे पहिले प्रकरण
दिल्ली विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेत असताना सीमा निर्भया सामूहिक बलात्कार आणि खुनाच्या घटनेच्या वेळी कोर्टात प्रशिक्षणार्थी म्हणून हजर असे. या घटनेनंतर सीमा यांनी निर्भयाचे प्रकरण विनामूल्य कोर्टात लढवणार असल्याचे घोषित केले आणि निर्भया प्रकरणातही नराधमांना खालच्या कोर्टापासून वरच्या कोर्टापर्यंत फाशी द्यावी यासाठी तिने अविरत लढा दिला.ज्योती लीगल ट्रस्टमध्ये रुजू झाली
दरम्यान वकील सीमा २०१४ मध्ये बलात्कार पीडितांसाठी न्याय मिळवून देणाऱ्या ज्योती लीगल ट्रस्टमध्ये रुजू झाली. ही ट्रस्ट बलात्कार पीडितांना विनामूल्य सल्ला देते आणि कोर्टात खटला देखील लढविण्यास मदत करते.
सीमा आयएएसची तयारी करत होती
एका टीव्ही चॅनेलशी बोलताना सीमा म्हणाली की, तिचे आयएएस होण्याचे स्वप्न आहे आणि ती यूपीएससी परीक्षा देण्यास तयारी देखील केली होती. सध्या ती सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारी वकील आहेत. निर्भयाचा खटला लढणं हे तिच्यासाठी एक मोठे आव्हान होते. निर्भयाच्या कुटूंबाशी, विशेषत: निर्भयाच्या आईशी तिचे भावनिक संबंध आहेत.
निर्भयाची आई म्हणाली धन्यवाद
निर्भयाच्या आईने प्रथम सीमा कुशवाहा यांना आरोपींना फाशी दिल्यानंतर धन्यवाद दिले. निर्भयाच्या आईने सांगितले की, आमच्या वकीलाशिवाय हे शक्य नव्हते.