हायव्होल्टेज ड्रामा! पोलीस स्टेशनसमोर महिलेने उडवल्या 500 च्या नोटा; कारण ऐकून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 03:57 PM2023-06-16T15:57:20+5:302023-06-16T16:03:03+5:30
एका महिलेने तिच्या बॅगमधून 500-500 रुपयांच्या नोटा काढून त्या रस्त्यावर उडवण्यास सुरुवात केल्याने गोंधळ उडाला.
मध्य प्रदेशच्या नीमच शहरातील सर्वात वर्दळीच्या रस्त्यावर आणि कँट पोलीस ठाण्यासमोर एक विचित्र घटना घडली आहे. एका महिलेने तिच्या बॅगमधून 500-500 रुपयांच्या नोटा काढून त्या रस्त्यावर उडवण्यास सुरुवात केल्याने गोंधळ उडाला. हे दृश्य पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. येणारी जाणारी लोक गाड्या थांबवून पैसे उडवणाऱ्या महिलेकडे पाहू लागले. त्यामुळे तेथे वाहतूककोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती. हे पाहून पोलिसांना परिस्थिती हाताळायला लागली. जमावाला पांगवावे लागले.
शहरातील राजीव नगर येथे राहणारी एक महिला (50 वर्षे) गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कँट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि रस्त्याच्या मधोमध उभं राहून तिच्या बॅगेतून अचानक 500-500 रुपयांच्या नोटा बाहेर काढत त्या उडवण्यास सुरुवात केली. नोटांचा पाऊस पडताना पाहून ये-जा करणाऱ्यांना आश्चर्य वाटलं. महिलेचा रस्त्यावर हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मोठी गर्दी झाली होती.
या नाट्यामुळे वाहतूककोंडी निर्माण होऊन दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नोटा उडवणाऱ्या महिलेने सांगितले की, पोलीस तिचं ऐकत नव्हते. तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई करण्यासाठी लाच मागितली जात होती. त्यामुळे महिलेने पोलीस ठाणे गाठून पोलिसांसमोरच नोटा उडवल्या. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
महिलेचा आरोप आहे की, तिच्या खऱ्या मुलाने वर्षभरापूर्वी तिला मारहाण केली होती. पोलिसांकडे याबाबत तक्रार केली, पण काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळेच तिला हे पाऊल उचलावं लागलं. मात्र, याप्रकरणी पोलिसांकडून कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर दुसरी ही महिला दररोज असे हायव्होल्टेज ड्रामा करत असते असं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.