'लोकमत वूमन समिट' मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांनी व्यक्त केलेले मनोगत आज महिला दिनानिमित्त खास तुमच्यासाठी पुन्हा देत आहोत.
पुणो : स्त्री सक्षमीकरण करण्यासाठी अनेक वर्षापासून प्रय} होत आहेत. मात्र, त्याचा वेग आपल्याला हवा तसा नाहीये. मुळात आपण एकाच वेळी वेगवेगळ्या शतकांत जगत आहोत. एकाच वेळी बदलते चित्र दिसत आहे, तर त्याच वेळी बंधनात अडकलेली स्त्री दिसत आहे. त्यामुळे बदलाची प्रक्रिया ही चिरंतन आहे आणि शाश्वत बदलांसाठी खूप काळ जावा लागेल. पण हार न मानता किमान आपल्या विचारांत, जाणिवांत रुतून बसलेल्या असमानतेला काढून फेकण्याची गरज आहे, अन् तिथूनच सुरुवात करण्याची गरज आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकत्र्या शबाना आझमी यांनी व्यक्त केले.
'लोकमत वूमन समिट ’ मध्ये आझमी यांनी उपस्थितांशी संवाद साधत निरनिराळ्या बाबींवर प्रकाश टाकला. ‘स्त्री सशक्तीकरण, स्त्री सुरक्षा किंवा अन्य कोणत्याही मुद्दय़ासाठी प्रत्येक वेळी सर्वानीच प्रत्यक्ष लढय़ात उतरण्याची गरज नसते. तसे अपेक्षितही नसते. मात्र, जे लोक समर्पित होऊन असे मुद्दे उचलून धरतात, झोकून देऊन काम करतात, त्याला पूर्ण समाजाने पाठिंबा देण्याची अत्यंत गरज आहे. त्या पाठिंब्यानेही प्रत्यक्ष काम करणा:यांना उभारी येते आणि आपला पाठिंबा असणो ही आपल्या बदलत्या जाणिवांचे द्योतक असते, असे सांगत आझमी यांनी बदलाच्या मंद वेगाविषयी आपल्या वडिलांनी सांगितलेला एक मंत्रही सांगितला.
आझमी म्हणाल्या, ‘‘बदलाची प्रक्रिया ही किचकट असते. त्याचा वेग आपल्याला अपेक्षित असेल त्या पद्धतीने नसेलही; किंबहुना ते बदल आपण जिवंत असताना आपल्याला अनुभवता येणारही नाहीत. मात्र, आपण जर प्रामाणिकपणो एखाद्या गोष्टीसाठी झटत असू, तर एक ना एक दिवस ते बदल घडतातच. त्यामुळे निराश न होता, आपण झटत राहायलाच हवे.
बदल म्हणजे लिटमस टेस्ट नव्हे
स्त्री सक्षमीकरणासाठी स्त्रियांनी बदलणो किंवा स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी पुरुषांनी बदलणो ही काही एका रात्रीत घडणारी गोष्ट नाही. बदल म्हणजे लिटमस टेस्ट नव्हे की टेस्ट केले की ‘रिझल्ट ’ मिळायला. शाश्वत बदलांसाठी समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. मानसिकतेत आपल्या जाणिवांत बदल आणण्याची गरज आहे. शाश्वत बदलांसाठी वर्षानुवर्षाचा झगडा द्यावाच लागणार आहे. गेल्या अनेक वर्षाच्या प्रयत्नांमुळे आता काही प्रमाणात बदल दिसतच आहेत. त्यात अधिक भर घालण्याची गरज आहे.